Thane: ठाणेकरांची मिटली चिंता, बारवी धारण 100% भरले
बारवी धरण भरण्यास अवघा दीड टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहे. धरणावर स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडले जातील. यामुळे धरण परिसर, नदीकाठची गावे व अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
Thane, दोन दिवसांत बारवी धरण (Barvi Dam) व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्यामुळे ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरण पूर्ण क्षमतेने (Capacity) भरले. त्यामुळे जिल्ह्याची वर्षभराची पाण्याची चिंता मिटली आहे. धरणातील पाणीसाठ्यात 7 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 11 ऑगस्टला बारवी धरणात 334.19 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 98.63 टक्के पाणीसाठा होता. सायंकाळच्या सुमारास हे धरण 100 टकके क्षमतेने भरले असल्याची माहिती लघु पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पावसाने उघडीप दिली होती. धरण परिसरात शून्य मिमी पावसाची नोंद होत होती. यामुळे बारवी पूर्ण क्षमतेने भरण्यास विलंब होण्याची चर्चा सुरू होती, मात्र गेल्या पाच दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली असून धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.
पाण्याचे नियोजन महत्त्वाचे
30 जुले ते 5 ऑगस्टपर्यंत धरणातील पाणीसाठा हा 86 टक्क्यांवर स्थिरावला होता. धरण परिसरात 0 मिमी पावसाची नोंद त्यादरम्यान झाली होती. 7 तारखेपासून धरण परिसरात पावसाचा जोर वाढला. चांगला पाऊस पडल्याने 9 तारखेला पाणीसाठा हा 91 टक्क्यांवर पोहोचला. दोन दिवसांत धरण परिसरात सरासरी अनुक्रमे 87 व 52 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यामुळे धरणतील पाणीसाठा आजच्या शंभर टक्क्यांवर पोहोचला आहे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने या वर्षीचे पाण्याचे नियोजन करणे सोपे जाणार आहे.
सतर्कतेचा इशारा
बारवी धरण भरण्यास अवघा दीड टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने अधिकारी वर्ग लक्ष ठेवून आहे. धरणावर स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यास धरणाचे दरवाजे कोणत्याही क्षणी आपोआप उघडले जातील. यामुळे धरण परिसर, नदीकाठची गावे व अंबरनाथ तालुक्यातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
मागील वर्षापिक्षा 16 टक्के अधिक पाणीसाठा
11 ऑगस्ट 2021 ला बारवी धरणा 278.64 दठालक्ष घनमीटर म्हणजे 82.23 टक्के पाणीसाठा होता. या वर्षी 2022 मध्ये 19 ऑगस्टला धरणात 334.19 दलक्ष घनमीटर म्हणजेच 98.63 टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षीपेक्षा 16 टाक्यांनी यंदा पाणीसाठा जास्त आहे.