ठाण्यात भरदिवसा दुकानाची तोडफोड, घटनेचा थरारक सीसीटीव्ही समोर
या व्हिडीओत दुकानातील वस्तू बाहेर फेकणाऱ्या समाजकंटकांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. (Thane Chat shop Vandalised)
ठाणे : ठाण्यात भरदिवसा एका दुकानाची तोडफोड झाल्याचा व्हिडीओ समोर आला आहे. यामुळे ठाण्यातील व्यापारी वर्गात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत कासारवडवली पोलीस ठाण्यात तक्रार करण्यात आली आहे. या व्हिडीओत दुकानातील वस्तू बाहेर फेकणाऱ्या समाजकंटकांचा शोध सध्या पोलीस घेत आहे. (Thane Chat shop Vandalised)
एकीकडे सुरक्षितेच्या दृष्टीने ठाणे शहरात पोलीस चांगली कामगिरी करत आहेत. तर दुसरीकडे मात्र भरदिवसा एका दुकानाची तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा थरारक व्हिडीओही समोर आला आहे.
घोडबंदर रोडवरील वाघबीळ भागात असलेल्या भूमी एकर्समध्ये चौपाटी चाट नावाचे दुकान आहे. या दुकान मालकाला स्थानिक आठ ते दहा गुंडांनी धमकी देऊन त्याच्या मालाची तोडफोड केली. याअगोदर त्यांनी दुकानात जाऊन धमकी दिली होती.
त्यावेळी तेथील कामगारांना मालकाला फोन लावण्यास सांगितले. तसेच आम्हाला हिरानंदानीमध्ये येऊन फोन करा, अन्यथा याचे परिणाम भोगावे लागतील असा धमकीवजा इशारा दिला होता.
त्यांनतर शुक्रवारी मालक जागेवर नसताना काही जणांनी दुकानाची तोडफोड केली. याबाबतचे सीसीटीव्ही फुटेज हाती आले आहेत. यात 8 ते 10 जणांनी तोडफोड केल्याचे दिसत आहे.
या घटनेमुळे व्यापारी लोकांमध्ये घबराट पसरली आहे. त्यामुळे आता या घटनेकडे पोलीस किती गंभीरतेने घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विशेष म्हणजे या आधी याच दुकानदाराला धमकावण्याचा व्हिडीओ ही समोर आला होता.
याप्रकरणी कासारवडवली पोलिसात तक्रार दाखल केली आहे. मात्र प्रत्यक्षात जागेवर तोडफोड करताना आठ ते दहा जण दिसत असताना पोलिसांनी केवळ नागेश शिंदे आणि इतर दोन जणांवर गुन्हे दाखल केले आहे. मात्र अद्याप आरोपींवर कोणतीही कारवाई झालेली नाही. आम्हाला या प्रकरणी न्याय हवा, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. (Thane Chat shop Vandalised)
संबंधित बातम्या :
‘शक्ती’ कायद्याला मंजुरी, महाविकास आघाडी सरकारचे अभिनंदन : आनंद शिंदे
घोडबंदर रोड आता होणार ट्रॅफिकमुक्त; खासदार राजन विचारेंच्या प्रयत्नांना यश