Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; पोलीस, राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलही तैनात

Thane Lok Sabha Election 2024 : ठाणे जिल्हा लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर १५ हजारांहून अधिक पोलिसांची ठाणे, भिवंडी, कल्याणवर नजर असेल. तर राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.

Lok Sabha Election 2024 : ठाणे लोकसभा निवडणुकीसाठी तगडा बंदोबस्त; पोलीस, राज्य राखीव दलासह केंद्रीय औद्योगिक दलही तैनात
Police
Follow us
| Updated on: May 19, 2024 | 9:55 AM

लोकसभा निवडणुका निर्धोक पार पडाव्यात यासाठी ठाणे लोकसभा मतदारसंघात पोलीस, राज्य राखीव दल आणि केंद्रीय औद्योगिक दलाच्याही तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांमध्ये १५ हजारांहून अधिक पोलिस बंदोबस्त तैनात राहणार असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

असा असेल बंदोबस्त

ठाणे शहर पोलिस आयुक्तालयात सध्या पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलिस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्यासह चार अतिरिक्त पोलिस आयुक्त, सात पोलिस उपायुक्त यांच्यासह 8 हजार पोलिसांचे संख्याबळ आहे. तिन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये बाहेरील जिल्ह्यांमधून अतिरिक्त तीन पोलिस उपायुक्त नऊ सहायक पोलिस आयुक्त आणि १९ निरीक्षक, तसेच नाशिक प्रशिक्षण केंद्रातील ८० प्रशिक्षण उपनिरीक्षक, पिंपरी- चिंचवडमधील ६९० अंमलदार, तीन हजार ४९१ होमगार्ड असा सात हजारांहून अधिकचा फौजफाटा आहे.

हे सुद्धा वाचा

केंद्रीय सुरक्षा दलासह राखीव पोलिसांच्या कंपन्या तैनात

  • ठाणे शहर परिमंडळ एकमध्ये सातारा, पुणे शहरामधून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या (सीआयएसएफ) तीन कंपन्या तर राज्य राखीव दलाची एक कंपनी तैनात केली आहे. परिमंडळ दोन भिवंडीमध्येही सीआयएसएफच्या पुणे आणि धाराशिवच्या चार कंपन्या आहेत. तर, परिमंडळ तीन कल्याणमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या रत्नागिरी आणि धाराशिवच्या दोन, कर्नाटकची एक आणि पुणे ग्रामीण एक अशा पाच कंपन्या आहेत.
  • तर, उल्हासनगर परिमंडळामध्ये सिुंधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या चार एसआरपीएफ तसेच बीएसएफच्या कंपन्या राहणार राहणार आहेत. तर, वागळे इस्टेट परिमंडळ पाचमध्ये कोल्हापूर आणि पुणे ग्रामीणच्या रेल्वे सुरक्षा दल, बीएसएफ आणि राज्य राखीव दल अशा तीन कंपन्या नेमल्या आहेत. याशिवाय, ठाणे, कल्याण, उल्हासनगर आणि वागळे इस्टेट या चार परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक, तर भिवंडीमध्ये दोन अशा सहा एसआरपीएफच्या प्लाटून आहेत. यामध्ये ठाणे ग्रामीण पोलिसांच्याही चार हजारांहून अधिक अधिकारी आणि कर्मचारी यांची भर राहणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हा संपूर्ण फौजफाटा मतदान केंद्र आणि इव्हीएम मशिन असलेल्या स्ट्रॉगरूमच्या ठिकाणी राहणार आहे.

एका कंपनीत १२० कर्मचारी

ठाणे जिल्ह्यात राज्य राखीव दलासह केंद्रीय राखीव पोलिसांच्या २५ कंपन्या राहणार आहेत. यातील एका कंपनीत १२० कर्मचारी असल्यामुळे सुमारे तीन हजारांहून अधिकचा हा फाैजफाटा यात राहणार आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.