Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane Crime : उल्हासनगरात पैशाच्या वादातून भररस्त्यात हाणामारी, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल

दोन तरुण एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. यावेळी अजुबाजुंच्या लोकांचीही धावपळ होताना दिसत आहे. काही वेळातच हे पकडपडवरील प्रकरण थेट हाणामारीवर पोहोचत आहे.

Thane Crime : उल्हासनगरात पैशाच्या वादातून भररस्त्यात हाणामारी, फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ व्हायरल
उल्हासनगरात पैशाच्या वादातून भररस्त्यात हाणामारीImage Credit source: tv9
Follow us
| Updated on: Apr 28, 2022 | 5:30 PM

ठाणे : गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीत (Thane Crime) कमालीची वाढ झाली आहे. कल्याण उल्हासनगर (Ulhasnagar Fight Video) भागात तर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अशातच आता उल्हासनगरमध्येही एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.उल्हासनगरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून (Money Dispute) भररस्त्यात हाणामारीची घटना घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओने सध्या परिसरात सध्या खळबळ माजली आहे. या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. या व्हिडिओच्या सुरूवातील पाहिल्यास आपल्याला एक डेकोरेशन केलेला मंडप दिसून येत आहे. या मंडपच्या जवळ तरुणांचा एक घोळका उभा राहिलेला दसतोय. मात्र अचनाक या व्हिडिओत या तरुणांचं कोणत्यातरी कारणावरून बिघडल्याने हे आपसात भिडताना दिसत आहे.

भररस्त्यात तुफान हाणामारी

त्यानंतर दोन तरुण एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. यावेळी अजुबाजुंच्या लोकांचीही धावपळ होताना दिसत आहे. काही वेळातच हे पकडपडवरील प्रकरण थेट हाणामारीवर पोहोचत आहे. या सुरूवातील पाढरा टी शर्ट घातलेला तरूण हा दुसऱ्या तरूणावर धाऊन जात त्याला मारहाण करताना दिसून येत आहे. त्यानंतर त्या तरुणाकडूनही त्याला जोरदार प्रतिकार होताना दिसत आहे. अशात अजुबाजुचे लोक हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे दोन्ही तरूण काही केल्या ऐकायला तयार होत नाहीत. त्यानंतर दुकानासमोर सुरू झालेलं हे भांडण रस्त्याच्या मध्यभागी पोहोचताना दिसून येत आहे. त्यानंतर या तरुणांची पळापळ होताना दिसून येत आहेत. हे तरुण एकमेकांच्या अंगावर पुन्हा धावून जात एकमेकांना मारहाण करताना दिसून येत आहे.

हाणामारीचा व्हिडिओ

दोन गटांच्या हाणामारीत रुपांतर

त्यानंतर दोन तरुणात सुरू झालेल्या या हाणामारीचे चक्क दोन गटांच्या हणामारीत रुपांतर होताना दिसून येत आहे. हा संपूर्ण राडा पूर्ण रस्त्यावर सुरू आहे. त्याचवेळी या रस्त्यावरून सर्वसामान्य लोकांची वर्दळही दिसून येत आहे. कुणीतरी हा व्हिडिओ बिल्डिंगच्या छतावरून आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थित टिपला आहे. आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र दोन गटात भर रस्त्यात झालेल्या या मारामारीने या परिसहात सध्या दहशत पसरली आहे. पोलिसांनी अजून या व्हिडिओची दखल घेतली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच हे मारामारी करणारे कोणते गट होते, त्यांची नावेही अद्याप कळू शकलेली नाहीत.

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.