ठाणे : गेल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यातील गुन्हेगारीत (Thane Crime) कमालीची वाढ झाली आहे. कल्याण उल्हासनगर (Ulhasnagar Fight Video) भागात तर अनेक धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. अशातच आता उल्हासनगरमध्येही एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.उल्हासनगरात पैशांच्या देवाणघेवाणीवरून (Money Dispute) भररस्त्यात हाणामारीची घटना घडली आहे. उल्हासनगरच्या कॅम्प 3 भागात घडलेल्या या प्रकाराचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या व्हिडिओने सध्या परिसरात सध्या खळबळ माजली आहे. या परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरलं आहे. या व्हिडिओच्या सुरूवातील पाहिल्यास आपल्याला एक डेकोरेशन केलेला मंडप दिसून येत आहे. या मंडपच्या जवळ तरुणांचा एक घोळका उभा राहिलेला दसतोय. मात्र अचनाक या व्हिडिओत या तरुणांचं कोणत्यातरी कारणावरून बिघडल्याने हे आपसात भिडताना दिसत आहे.
त्यानंतर दोन तरुण एकमेकांवर हल्ला करताना दिसत आहेत. यावेळी अजुबाजुंच्या लोकांचीही धावपळ होताना दिसत आहे. काही वेळातच हे पकडपडवरील प्रकरण थेट हाणामारीवर पोहोचत आहे. या सुरूवातील पाढरा टी शर्ट घातलेला तरूण हा दुसऱ्या तरूणावर धाऊन जात त्याला मारहाण करताना दिसून येत आहे. त्यानंतर त्या तरुणाकडूनही त्याला जोरदार प्रतिकार होताना दिसत आहे. अशात अजुबाजुचे लोक हे भांडण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र हे दोन्ही तरूण काही केल्या ऐकायला तयार होत नाहीत. त्यानंतर दुकानासमोर सुरू झालेलं हे भांडण रस्त्याच्या मध्यभागी पोहोचताना दिसून येत आहे. त्यानंतर या तरुणांची पळापळ होताना दिसून येत आहेत. हे तरुण एकमेकांच्या अंगावर पुन्हा धावून जात एकमेकांना मारहाण करताना दिसून येत आहे.
Ulhasnagar : पैशाच्या वादातून उल्हासनगरमध्ये दोन गटात फ्री स्टाईल हाणामारी pic.twitter.com/Z3DaSa2Yp0
— TV9 Marathi (@TV9Marathi) April 28, 2022
त्यानंतर दोन तरुणात सुरू झालेल्या या हाणामारीचे चक्क दोन गटांच्या हणामारीत रुपांतर होताना दिसून येत आहे. हा संपूर्ण राडा पूर्ण रस्त्यावर सुरू आहे. त्याचवेळी या रस्त्यावरून सर्वसामान्य लोकांची वर्दळही दिसून येत आहे. कुणीतरी हा व्हिडिओ बिल्डिंगच्या छतावरून आपल्या मोबाईलमध्ये व्यवस्थित टिपला आहे. आणि सोशल मीडियावर शेअर केला आहे. मात्र दोन गटात भर रस्त्यात झालेल्या या मारामारीने या परिसहात सध्या दहशत पसरली आहे. पोलिसांनी अजून या व्हिडिओची दखल घेतली आहे की नाही, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. तसेच हे मारामारी करणारे कोणते गट होते, त्यांची नावेही अद्याप कळू शकलेली नाहीत.