ठाण्यात बोलताना फडणवीसांनी कोकणचं उदाहरण दिलं अन् उद्धव ठाकरेंना टोला लगावला

Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाण्यात बोलताना उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीवरही देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं. ठाण्याच्या मेळाव्यात देवेंद्र फडणवीस काय म्हणाले? वाचा सविस्तर...

ठाण्यात बोलताना फडणवीसांनी कोकणचं उदाहरण दिलं अन् उद्धव ठाकरेंना टोला लगावला
देवेंद्र फडणवीस Image Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Jun 16, 2024 | 8:33 PM

ठाण्यात आज महायुती विजय संकल्प मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित केलं. यावेळी कोकणच्या लोकसभा निवडणुकीचं उदाहरण देत देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गट आणि पर्यायाने उद्धव ठाकरे यांना जोरदार टोला लगावला आहे. सर्वांचं अभिनंदन… कोकणात महायुतीला प्रचंड यश मिळालं. काही लोक म्हणाले आम्ही तुम्हाला तडीपार करू कोकणच्या जनतेने त्यांना तडीपार केलं… आता कोकण पदवीधर मतदारसंघाचे निवडणूक आली आहे. तेव्हा पुन्हा एकदा कोकणचा आशीर्वाद महायुतीला मिळणार आहे, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

राज ठाकरेंचे आभार

सर्वात आधी राज ठाकरे यांचे आभार मानतो. अभिजीत पानसे हे उमेदवार होते. पण आम्ही राज ठाकरे यांना विनंती केली. निरंजन डावखरे आमचे आमदार आहेत. आपण महायुती म्हणून काम करत आहोत. त्यामुळे तुम्ही उमेदवाराला थांबायला सांगावं. त्याप्रमाणे राज ठाकरे यांनी निर्णय घेतला आणि अभिजित पानसे यांनी सर्व मेहेनत निरंजन यांच्या पाठीशी उभी केली, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

भिवंडीतील लढतीवर फडणवीस काय म्हणाले?

भिवंडीची जागा येऊ शकली नाही. तिकडे काय घडले ते माहीत आहे. जे मुंब्र्यात घडले तेच भिवंडीत घडले, असो ते आपण सुधारू. आता पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होत आहे. कोकण पदवीधर मतदारसंघासाठी निश्चितपणे चांगला उमेदवार महायुतीने दिला आहे. इतर निवडणुकीपेक्षा नियोजनाची आणि वेगळी निवडणूक आहे. या निवडणुकीमध्ये सभा- रॅली घ्यायच्या नाही. मॅन टू मॅन पोहचयाचं आहे. सव्वालाख नोंदणी झाली आहे. ठाणे जिल्ह्यावर जास्त जबाबदारी आहे. पालघरवर आणि इतर जिल्ह्यांवर जबाबदारी आहे, असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

निरंजन चेहेरा जेवढा पुढे नेणार तेवढा फायदा होणार आहे. जुनी पेंशन योजनेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तोडगा काढला आहे. विधान सभेत मांडला जाणार आहे. मोठा निर्णय आपण घेतला आहे. संघटनेसाठी मोठा निर्णय घेतला आहे. 2005 पूर्वी शिक्षक होते. त्यांच्याबाबत सकारात्मक कारवाई करत प्रश्न सोडवले जात आहेत. आपल्या काळात अनेक प्रश्न सोडत आहे आणि ते आपल्या मागे उभे आहेत, असंही फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
भाजपच्या कोअर कमिटीच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब.
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?
शिंदे DCM पद स्वीकारणार? फडणवीसांच्या भेटीनंतर निर्णय, ही खाती मिळणार?.
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?
शिंदे अन् फडणवीसांमध्ये वर्षावर अर्धा तास खलबतं, बंद दाराआड काय चर्चा?.
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?
2019 ते 2024 चं सत्ताकारण अन् गणितं बदलली, पण पदांचा पेच कायम?.
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी
गृहखात्यानंतर आता गृहनिर्माणवरून रस्सीखेच, शिवसेनेच्या नेत्यांची मागणी.
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला
'संजय राऊत स्वतः डोंबाऱ्याचा माकड झालाय', भाजपच्या बड्या नेत्याचा टोला.