Thane : सेनेचे नेते आनंद दिघे यांनी सुरु केलेली परंपरा 23 व्या वर्षीही सुरु, नववर्षाचं स्वागत रक्तदानानं
नववर्षाच्या स्वागतासाठी परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं.
ठाणे: शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी नववर्षाचं स्वागत रक्तदान शिबीरानं करण्याची परंपरा यंदाही जपण्यात आली. नववर्षाच्या स्वागतासाठी परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे रक्तदान शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मध्यरात्री रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदात्यांचे सन्मानपत्र देऊन कौतुक केले. रक्तदान शिबीरात 250 हून अधिक जणांनी रक्तदान केलं.
रक्तदान चळवळीचं 23 वं वर्षं
नवं वर्षाचं स्वागत सर्वच ठिकाणी जल्लोषात होत असतानाच दुसरीकडे सर्वांनाच रक्तदानाचे महत्व समजावं या करिता ठाण्यात रक्तानंद ग्रुप च्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांनी सुरु केलेल्या या चळवळीचे यंदाचे 23 वे वर्ष होते.
नववर्षाच्या स्वागतार्थ वंदनीय गुरुवर्य स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेब यांनी सुरू केलेला परंपरेनुसार दरवर्षीप्रमाणे यंदाही ठाणे शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या मध्यरात्री रक्तदान शिबिरास उपस्थित राहून रक्तदात्यांचे सन्मानपत्र देऊन कौतुक केले pic.twitter.com/DH74HduSQy
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) December 31, 2021
250 हून अधिक रक्तदात्यांचा प्रतिसाद
नवीन वर्षाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबीरात 250 हून अधिक रक्तदात्यानी या शिबीरात सहभाग घेतला. रक्तदात्यांनी रक्तदान करून आजचा दिवस सार्थकी लावला आहे असं म्हणत या उपक्रमाला ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या.
रक्तदात्यांचा रक्तकर्ण पुरस्कार देऊन सन्मान
ठाण्यातील शिवाजी मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या या शिबिराला जिल्ह्या भरासह राज्यातील इतर रक्तदात्यांनी देखील हजेरी लावली होती. यावेळी गेली अनेक वर्ष रक्तदान करणाऱ्या रक्त दात्यांचा एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रक्तकर्ण पुरस्कार देण्यात आला.
थॅलेसिमिया ग्रस्त रुग्णांना रक्तपुरवठा
रक्तदानाच्या माध्यमातून जमा होणारे रक्त थॅलेसिमिया ग्रस्तरुग्णांना रक्त पिढीच्या माध्यमातून देण्यात येणार आहे. मध्यरात्रीच्या रक्तदान शिबिराला देखील चांगलाच प्रतिसाद लाभला असल्याचं यावेळी दिसून आलं. एकनाथ शिंदे यांनी ओमिक्रॉन संसर्ग आणि 15 ते 18 वर्षातील मुलांचं लसीकरण ,बूस्टर डोस याची काळजी राज्य सरकार आणि महानगरपालिका योग्य रित्या सांभाळत आहे, असं सांगितलं.
इतर बातम्या:
भारतात उपलब्ध असलेल्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक गाड्या, जाणून घ्या टॉप 5 कार्सच्या किंमती आणि फीचर्स
Yamaha Aerox 155 ते TVS Jupiter 125, 2021 मध्ये लॉन्च झाल्या शानदार स्कूटर्स, पाहा टॉप 5 गाड्या
सिंगल चार्जमध्ये 150KM रेंज, One-Moto ची इलेक्ट्रिक स्कूटर भारतात लॉन्च
Thane Eknath Shinde present at Blood Donation camp organised to welcome New Year which started by Anand Dighe