New Year Celebration | हवी तेवढी घ्या आणि सुरक्षित घरी जा, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून मद्यपींसाठी अनोखी सुविधा

या सुविधेतंर्गत मद्यपींना वाहन आणि वाहन चालकाची सुविधा दिली जाणार आहे. (Thane Hotel Businessman Provide Vehicle Service)

New Year Celebration | हवी तेवढी घ्या आणि सुरक्षित घरी जा, ठाण्यातील हॉटेल व्यावसायिकांकडून मद्यपींसाठी अनोखी सुविधा
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 9:53 PM

ठाणे : थर्टीफस्ट आणि राज्यात रात्री 11 ते सकाळी 6 पर्यंत असलेली संचारबंदी यामुळे तळीरामचं आणि नववर्षाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्यांचा हिरमोड झाला आहे. मात्र त्यांना सुरक्षित घरी पोहोचवण्यासाठी ठाण्यातील हॉटेल व्यवसायिकांनी अनोखी सुविधा देण्याचा निर्णय घेतला आहे. हवी तेवढी घ्या…आणि सुरक्षित घरी जा.. असे या सुविधेचे नाव आहे. या सुविधेतंर्गत मद्यपींना वाहन आणि वाहन चालकाची सुविधा दिली जाणार आहे. (Thane Hotel Businessman Provide Vehicle Service)

थर्टीफस्टच्या जल्लोषात मद्यपींना आवर घालण्यासाठी आणि ड्रिंक एंड्र ड्राईव्ह कारवाई करण्यासाठी मोठा फौजफाटा नाक्या-नाक्यावर तैनात करावा लागतो. त्यात मद्य प्राशन करून भरधाव वेगाने वाहन चालविणे, अपघात होणे, अशा दुर्दैवी घटना नववर्षाच्या स्वागताच्या दिवशीच घडतात.

यंदा थर्टीफस्ट हा संचारबंदीच्या सावटाखाली असल्याने वेळेत दारु पिणे आणि घरी जाणे एवढेच आता मद्यपींच्या हातात आहे. आपल्या ग्राहकांनी सुरक्षित घरी जावे यासाठी घोडबंदर परिसरातील हॉटेल व्यवसायिकांनी एक अभिनव सुविधा सुरु केली आहे. या हॉटेलमध्ये आलेल्या मद्यपींना मद्य घेऊन वाहन चालविण्याची गरज नाही. त्यांना सुरक्षित घरी पोहचविण्यासाठी हॉटेल मालकाने वाहने आणि वाहन चालक तैनात केले आहेत. हॉटेलमध्ये हवी तेवढी घ्या…. अन् घरी अपघातविरहीत सुरक्षित जा” अशी संकल्पना यंदा राबविलेली आहे.

यंदा संचारबंदीमुळे वेळेचे बंधन आहे. त्यामुळे मद्य प्राशन केलेल्या ग्राहकाला सुरक्षित वाहनाने घरी सोडण्यात येणार आहे. कारण मद्य प्राशनानंतर होणारे अपघात टाळण्यासाठी ही संकल्पना राबवण्यात येणार आहे, असे हॉटेल मालकांनी सांगितले.

थर्टीफस्टला बारमध्ये जाऊन मद्य पिणाऱ्या आणि प्यालेल्या ग्राहकाला घरापर्यंत सुरक्षित पोचवण्यासाठी ही अतिशय चांगली संकल्पना आहे. यामुळे ग्राहकांचे हित जपले जात आहे. त्यामुळे ड्रिंक ॲण्ड ड्राईव्हसारख्या गुन्ह्यापासून ग्राहक लांब राहणार आहे. तसेच चांगली योजना आहे. यामुळे अपघाताला आळा  बसेल, रस्त्यावर मद्यपींचा धुमाकूळ थांबेल. हॉटेलच्या सुविधेमुळे ग्राहक जास्त मद्य प्राशन केले, तरीही त्याला सुरक्षित घरी जात येईल. त्यामुळे या संकल्पनेचे ग्राहकही स्वागत करत आहेत. (Thane Hotel Businessman Provide Vehicle Service)

संबंधित बातम्या : 

विवाहासाठी भरपूर मुहूर्त, सुट्ट्यांची चंगळ आणि बरंच काही, 2021 मध्ये काय काय घडणार?

कंटेनमेंट झोनबाहेर फिरायला जाताय? सरकारची ही नियमावली तुमच्यासाठी

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.