पहाटेचा शपथविधी अन् अजित पवारांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं भाष्य; म्हणाले, पवारांनी कुणालाही…

Jitendra Awhad on Ajit Pawar about 2019 Swearing ceremony : पहाटेचा शपथविधी अन् अजित पवारांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाड यांचं भाष्य... जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले? ठाण्यातील पत्रकार परिषदेत जितेंद्र आव्हाड यांनी कोणत्या मुद्द्यांवर भाष्य केलं? वाचा सविस्तर...

पहाटेचा शपथविधी अन् अजित पवारांच्या दाव्यावर जितेंद्र आव्हाडांचं भाष्य; म्हणाले, पवारांनी कुणालाही...
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Apr 20, 2024 | 3:58 PM

देशातील एक नंबरच्या उद्योगपतीच्या घरी अमित शाह, प्रफुल पटेल , शरद पवार आणि मी आम्ही एकत्र बसायचो. पाच ते सहा वेळा आमची त्यावेळी भाजपासोबत जाण्याची चर्चा झाली. कुणाला मंत्रीपद द्यायचं हे देखील ठरलं. मुंबईत आल्यानंतर वरिष्ठांनी निर्णय बदलला. पण पुढे मी शब्द पाळत 2019 ला भाजपसोबत उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, असं म्हणत अजित पवार यांनी काल पहाटेच्या शपथविधीचा पट उलघडला. यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी यावर भाष्य केलं आहे. आव्हाड यांनी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली.

आव्हाड म्हणाले…

शरद पवार यांनी कोणालाही कधीही शब्द दिला नव्हता. चर्चा करू याचा अर्थ निर्णय झाला नाही. शरद पवारांना तर टीव्हीवरून समजलं होतं. कशाला त्यांचं नाव घेता? भावनांचं राजकारण कशाला करत आहेत. महागाई, शेतकरी, जातिवाद धर्मवाद यावर बोलूया… उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आहे त्यांनी यावर सांगावं. चर्चा काय झाली यासंदर्भात महाराष्ट्रला देणंघेणं नाही. पुरोगामी महाराष्ट्र टिकणार की नाही हा प्रश्न आहे. पुरोगामी महाराष्ट्र टिकवण्याचं काम शरद पवारांनी केलं आहे. तुम्ही मोक्यातील आरोपी सोडू शकतात, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

अजित पवारांवर टीकास्त्र

कुटुंबातून फक्त तुम्हाला संधी द्यायची का? तुम्हाला संधी दिली तर महाराष्ट्राने सर्व पाहिलं आहे. महाराष्ट्र विसरलेला नाही तुमचे गद्दारी आणि तुमचं शेवटचं भाषण कधी होणार आहे. तुम्ही जशी काय अंत्ययात्राचीच वाट बघत आहेत. महाराष्ट्र भाषण विसरला नाही आणि विसरणार देखील नाही. इतका घाण भाषण आपल्या बापाबद्दल हे राजकारणात कोणी केलं नसेल, असं म्हणत आव्हाडांनी अजित पवार यांच्यावर टीकास्त्र डागलं.

पंतप्रधानपदावर भाष्य

आमच्याकडे अनेक निस्वार्थी चेहरे आहेत. राहुल गांधीला संधी मिळाली तर त्यांना पाठिंबा देऊ. शरद पवारांना संधी मिळाली तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ. भिवंडी या लोकसभा मतदारसंघामध्ये चांगलं वातावरण आहे. काँग्रेसचे खालचे-वरचे कार्यकर्ते कामाला लागलेले आहेत. समज-गैरसमज असतात. सर्व मिळून आम्ही कामाला लागलो आहे, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.