गुरांना चोरी करण्यासाठी आल्याचा संशय, कल्याणमध्ये तरुणाला बेदम मारहाण, टेम्पोसुद्धा पेटवला

कल्याणमधील खडवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पशूंचा चोरी करण्याच्या संशयावरुन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे. (kalyan young man beaten stealing animals)

गुरांना चोरी करण्यासाठी आल्याचा संशय, कल्याणमध्ये तरुणाला बेदम मारहाण, टेम्पोसुद्धा पेटवला
THANE BEATING
Follow us
| Updated on: Apr 28, 2021 | 8:57 PM

ठाणे : कल्याणमधील खडवलीत एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरांची चोरी करण्याच्या संशयावरुन एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आलीये. यामध्ये तरुणाचा टेम्पोसुद्धा पेटवून देण्यात आलाय. हा प्रकार घडल्यानंतर येथे काही काळासाठी तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यानंतर टिटवाळा पालिसांनी तरुणाला मारहाण करणाऱ्या तीन जणांना अटक केली. पोलीस अन्य आरोपींच्या शोधात आहेत. 26 एप्रिल रोजी हा प्रकार घडला. त्यांना आज (28 एप्रिल) न्यायालयात हजर करण्यात आले होते. (Thane Kalyan young man has been beaten to death on suspicion of stealing Animals)

गुरं चोरत असल्याच्या तरुणाला संशय

मिळालेल्या माहितीनुसार शहापूर तालुक्यातील हाल गावातील एक तरुण मासे पकडण्यासाठी खडवलीमधील दानबाव परिसरात आला होता. यावेळी एक धक्कादायक प्रकार समोर आला. याठिकाणी राहणाऱ्या काही तरुणांनी हाल गावातील या तरुणाचा टेम्पो अडवला. तसेच त्याला विचारपूस केली. यावेळी टेम्पो चालक काही गुरं चोरत असल्याच्या संशय या तरुणांना आला. त्यानंतर चर्चेदरम्यान टेम्पोचालक आणि या तरुणांमध्ये वाद सुरु झाला.

टेम्पोसुद्धा पेटवला

या वादात तरुणांनी टेम्पो चालकास बेदम मारहाण केली. तसेच या मारहाणीदरम्यान तरुणाचा टेम्पोसुद्धा पेटवून दिला. 26 जानेवारी रोजी ही घटना घढली. या घटनेची माहिती होताच टिटवाळा पोलिसांना कारवाई करण्यास सुरुवात केली.

पोलिसांकडून तिघांना अटक

टिटवाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. त्यांनी एक पथक तयार केले. पोलिसांकडे आरोपीचा पत्ता किंवा ओळख नसताना सूत्रांचा वापर करुन पोलिसांनी या प्रकरणी तिघांना ताब्यात घेतले.

अन्य आरोपींचा शोध सुरु

या प्रकरणी संतोष शेलके, काळूराम पवार आणि अन्य एकाला अटक करण्यात आली आहे. तसेच याबाबत बोलताना वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजू वंजारी यांनी अधिक माहिती दिलीये. त्यांनी सांगितल्यानुसार मारहाण झालेला तरुण हा मासे पकडण्यासाठी आला होता. तो गुरं चोरी करण्यासाठी आल्याच्या संशयावरुन त्याला मारहाण करण्यात आली. या प्रकरणात तिघांना अटक करण्यात आले असून अन्य आरोपींचा शोध सुरु आहे.

इतर बातम्या :

हाय प्रोफाईल लोकांच्या घरी चोरी करण्याचा प्रयत्न, वकिलाच्या घरात शिरताच रंगेहाथ बेड्या

मास्क न घालणाऱ्यांची दादागिरी, थेट पोलिसाच्या अंगावर सोडला कुत्रा, पोलीस कर्मचारी जखमी, गुन्हा दाखल

VIDEO : नेमकं असं काय घडलं ज्यामुळे पतीने स्वत:च्या गर्भवती पत्नीवर गोळ्या झाडल्या? थरार सीसीटीव्हीत कैद

(Thane Kalyan young man has been beaten to death on suspicion of stealing Animals)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.