“एखादी इन्क्वायरी लागेल ना, धूर निघेल धूर…”; ‘या’ आमदारानं आयुक्तांना सरळ उघडच पाडलं..

सुबोध ठाणेकर यांनी आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत मात्र जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाल ज्या माणसाने पैसे दिले आहेत.

एखादी इन्क्वायरी लागेल ना, धूर निघेल धूर...; 'या' आमदारानं आयुक्तांना सरळ उघडच पाडलं..
Follow us
| Updated on: Jan 28, 2023 | 9:41 PM

मुंबईः सध्या ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध ठाणेकर आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या ऑडिओ क्लिपची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. सोशल मीडियावरही ती प्रचंड व्हायरल झाली आहे. ठाणे पालिका अधिकारी सुबोध ठाणेकर यांच्यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सुबोध ठाणेकर यांनी अवैध बांधकामांना संरक्षण दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यांनी केलेल्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून जितेंद्र आव्हाड यांनी थेट त्यांनी एका व्यक्तीकडून वीस लाख रुपये घेतले असल्याचा आरोप केला आहे.

तर ज्या माणसाने सुबोध ठाणेकर यांना पैसे दिले आहेत त्या माणसाला तुमच्यासमोर मी उभा करतो असं थेट इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

त्यानंतर सुबोध ठाणेकर यांनी आपल्यावर खोटे आरोप केले जात असल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले आहेत मात्र जितेंद्र आव्हाड यांनी तुम्हाल ज्या माणसाने पैसे दिले आहेत.

त्या माणसाला तुमच्यासमोर उभा करतो असं सांगत आता तुमची माझी पर्सनल लढाई सुरु असा गर्भित इशाराही जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

तुम्ही रोहिदास पाटलांकडून तुम्ही वीस लाख रुपये घेतले आहेत हा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्तांवर करताच त्यांनी आपल्यावर काही ही आरोप करत आहेत असं स्पष्टीकरण दिले आहे.

त्यानंतर पैसे देणाऱ्या माणसाला तुमच्यासमोर उभा करू का असा थेट त्यांना सवाल करण्यात आला आहे. त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी त्यांना उद्या एखादी इन्क्वायरी लागली ना तर धूर निघेल धूर असा इशाराही त्यांनी त्यांना दिला आहे.

ही चौकशी लागल्यानंतर मात्र सर्वात बदनाम होतील ती तुमची पोरं अशा शब्दात त्यांनी आयुक्तांना सुनावले आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आयुक्त सुबोध ठाणेकर यांना मी तुमच्याकडे पुरावे घेऊन येईन,

ज्या माणसाने तुम्हाला वीस लाख रुपये दिले आहेत या आरोपानंतर आयुक्तांनी ते सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्यानंतर मात्र जितेंद्र आव्हाड यांनी आता उद्यापासून तुमची आणि माझी पर्सनल लढाई सुरू असा इशाराच त्यांना त्यांनी दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.