Thane Municipal Election Reservation list 2022 Maharashtra :ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! ठाण्यातला कोणता वॉर्ड कुणासाठी आरक्षित? वाचा
Thane Municipal Election Reservation Seats 2022 : सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे.
ठाणे : राज्यात महापालिका निवडणुकांचे (Municipal Elections) वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर राज्यातील महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारविरुद्ध भाजप अशी रंगतदार लढत आगामी पालिका निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने 14 महापालिकांना 31 मेपर्यंत प्रभागनिहाय आरक्षण (Ward wise reservation) सोडत जाहीर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार सोडत प्रक्रिया पार पडली. अशावेळी राज्यातील महापालिकांची आरक्षण सोडत कशी असेल, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. सर्व राजकीय पक्षांसह इच्छुक उमेदवारांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. मुंबई, नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे महापालिकांचा समावेश आहे. चला तर जाणून घेऊया ठाणे पालिकेचं इत्यंभूत वॉर्डनिहाय
पालिकेचं नाव : ठाणे महापालिका
- एकूण प्रभाग- 47
- एकूण जागांची संख्या – 142
- त्रिसदस्य प्रभाग 46
अनुसूचित जमाती
- 1 अनुसूचित जातीसाठी आरक्षित प्रभाग- 10
- 2. अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित होणारे प्रभाग- 05
- 3. अनुसूचित जमाती प्रभाग संख्या- 03
सर्वसाधारण (ओपन कॅटेगिरी)
- खुला प्रभाग 129 महिला 64
अनुसूचित जाती
- प्रभाग क्रमांक – 3अ,10अ ,12अ ,15 अ, 23 अ, 24 अ, 27 अ, 29 अ, 34 अ, 44अ
अनुसूचित जाती आरक्षित प्रभाग
- प्रभाग क्रमांक – 3अ, 12अ, 15अ, 23अ, 29अ
अनुसूचित जमाती
- प्रभाग क्रमांक – 6अ, 29ब, 5अ
सर्वसाधारण आरक्षित प्रभाग
- प्रभाग क्रमांक -( प्रभाग 1 ते प्रभाग 47 – क ), 4ब,7ब, 8ब, 9ब, 11ब, 14ब, 17ब, 19ब, 22ब, 28 ब, 30ब, 31ब, 33ब,35 ब, 37ब, 38ब, 40ब
सर्वसाधारण साधारण महिला आरक्षित प्रभाग
- प्रभाग क्रमांक – 1अ, 2अ ,4अ , 7अ , 8अ , 9अ , 11अ, 13अ, 14अ, 16ते 22अ, 25 अ, 26अ, 28 अ, 30 ते 33 अ, 35te43 अ, 45ते 47 अ…
कोणत्या पालिकेचं सध्याचं पक्षीय बलाबल काय?
- शिवसेना – 67
- राष्ट्रवादी – 34
- भाजप – 23
- काँग्रेस – 3
- एमआयएम – 2
- अपक्ष – 2