Thane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल

या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर कक्षाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची झोप उडाली आहे. तसेच हा खोडसाळपणा तर नाही ना याचा तपास ठाणे नगर पोलीस सायबरच्या सहाय्याने करत आहेत.

Thane : शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी; ठाणे पोलीस शाळेला आला ईमेल
शाळा, महाविद्यालय, रेल्वे स्थानक बाँबने उडविण्याची धमकी
Follow us
| Updated on: Jan 23, 2022 | 11:11 PM

ठाणे : ठाण्यातील पोलीस शाळेच्या(Thane Police School) मेल आयडीवर जिहाद 2022(Jihad 2022) च्या मेलवरून धमकीचा मेल आला आहे. या मेलमध्ये शाळा, महाविद्यालय आणि रेल्वे स्थानक बाँबने उडवून देण्याच्या धमकीचा ईमेल आल्याने खळबळ उडाली आहे. संपूर्ण हिंदुस्थानात जिहादचे पालन करण्यासाठी कुर्बानी आणि धमाका हे दोन मार्ग असल्याचे या मेलवरील मजकूरात म्हटले आहे. या घटनेप्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून ठाणे पोलिसांच्या सायबर कक्षाकडून याप्रकरणाचा तपास सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या 26 जानेवारीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची झोप उडाली आहे. तसेच हा खोडसाळपणा तर नाही ना याचा तपास ठाणे नगर पोलीस सायबरच्या सहाय्याने करत आहेत. (Thane police threatened to blow up schools, colleges, railway stations by email)

काय लिहिलेय जिहादच्या मेलमध्ये ?

या मेलमध्ये ”मै जावेद खान लष्कर 29 का प्रमुख होने के नाते मेल भेज रहा हूँ …. हमारा एकही मक्सद है पुरे हिंदुस्थान मे जिहाद का पालन हो.. तभी यह देश प्रगती करेगा. इस लिए हमने दो मार्गो का स्विकार किया है कुर्बानी.. और धमाका…. लष्कर 29 मे कई मुजाहिद सदस्य है, जो हर घर मे जिहाद पहुँचाना चाहते है.. लष्कर 29 जिहाद को मानने वाली हिंदुओ की संघटना है.. धमाका- बिना धमाके के लोगो को समझ नही आती. हिंदुस्थान मे जिहाद पालन करने मे सबसे बडी प्रॉब्लेम यहा की एज्युकेशन सिस्टम है.. यहा की एज्युकेशन सिस्टम बंद करके सिर्फ मदरसा द्वारा शिक्षा देनी चाहिए. तभी जिहाद के बारे मे पुरी जानकारी मिलेगी. हम मुंबई के स्कुल और कॉलेज मे धमाके करेंगे”, असे या मेलमध्ये म्हटले आहे. याबाबतची माहिती ठाणेनगर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दखल घेत सायबर कक्षाच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षेत वाढ

प्रजासत्ताक दिनी दिल्लीत दहशतवाद्यांकडून हवाई हल्ला होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दिल्लीत सुरक्षेच्या दृष्टीने कठोर पावले उचलण्यात आली आहेत. दिल्लीत पुढील 27 दिवस कोणत्याही प्रकारचे ड्रोन, पॅरा ग्लायडिंग, पॅरा मोटर्स, हँग ग्लाईडर, मानवरहित एरियल वाहन हवेत उडविण्यावर बंदीचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिले आहेत. दिल्लीचे पोलीस आयुक्त राकेश अस्थाना यांनी सुरेक्षेबाबत आदेश काढला आहे. यामध्ये ड्रोनबरोबरच हवेत उडवल्या जाणाऱ्या वस्तूंवर बंदी घालण्यात आली आहे. सुरक्षा व्यवस्थेकडून दहशतवादी हल्ल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस आयुक्तांकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. (Thane police threatened to blow up schools, colleges, railway stations by email)

इतर बातम्या

MP: लग्नाचे रिसेप्शन, वऱ्हाड्यांचा डीजेवर ताल, अचानक तरुण कोसळला, मित्र म्हणाले नाटक करतोय; वाचा पुढे नेमकं काय घडलं?

Satara : साताऱ्यात अंनिसने उतरवलं अंधश्रद्धेचं भूत, जनजागृती करीत महिलेच्या डोक्यावरील जटा कापल्या!

Non Stop LIVE Update
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला
'मुंडे 12 वर्ष वनवासात, बऱ्याच गोष्टी इच्छेविरुद्ध...',अंधारेंचा टोला.
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.