पुन्हा एकदा क्लस्टरचे गाजर .. ! राष्ट्रवादी युवकच्या बॅनरबाजीनं ठाण्यात पुन्हा आघाडीत बिघाडीचं दर्शन

एकीकडे महाराष्टाच्या राजकारणात महाविकास आघाडीत शिवसेना (Shivsena) व राष्टवादी काँग्रेस (NCP) एकत्रित काम करताना दिसतं. मात्र, ठाण्यात याच आघाडीत खारेगाव पुलाच्या वादानंतर पुन्हा आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आलेय.

पुन्हा एकदा क्लस्टरचे  गाजर .. ! राष्ट्रवादी युवकच्या बॅनरबाजीनं ठाण्यात पुन्हा आघाडीत बिघाडीचं दर्शन
NCP Banner Thane
Follow us
| Updated on: Jan 29, 2022 | 7:47 AM

ठाणे : एकीकडे महाराष्टाच्या राजकारणात महाविकास आघाडीत शिवसेना (Shivsena) व राष्टवादी काँग्रेस (NCP) एकत्रित काम करताना दिसतं. मात्र, ठाण्यात याच आघाडीत खारेगाव पुलाच्या वादानंतर पुन्हा आघाडीत बिघाडी झाल्याचे समोर आलेय. ठाणे महापालिकेच्या निवडणुकीच्या (Thane Municipal Corporation Election) पार्श्वभूमीवर सत्ताधारी शिवसेनेने पुन्हा एकदा क्लस्टरचा मुद्दा हाती घेतला आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी सामंजस्य करार करत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या त्यानंतर क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात आले. सत्ताधाऱ्यांच्या याच खेळीच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने बॅनरबाजी करण्यात आली असून पुन्हा एकदा क्लस्टरचे गाजर दाखवण्यात आले असल्याची अप्रत्यक्ष टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी कडून जिल्हा अध्यक्ष विक्रम खामकर यांच्या कडून करण्यात आली आहे.

क्लस्टरचं पुन्हा एकदा गाजर ,आता तरी जागा हो ठाणेकर, राष्ट्रवादी युवकचे बॅनर

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीकडून ठाणे महापालिका मुख्यालयासमोर “क्लस्टरचं पुन्हा एकदा गाजर ,आता तरी जागा हो ठाणेकर” अशी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले असून गेली 10 वर्ष सत्ताधारी शिवसेना लोकांना मूर्ख बनवत असल्याची टीका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम खामकर यांनी केली. तर, पुन्हा सत्तेत येण्यासाठी शिवसेना क्लस्टरचे गाजर दाखवत असल्याचे देखील खामकर यांनी यावेळी सांगितले.

बॅनरनं वेधलं ठाणेकरांचं लक्ष

ठाणे महापालिकेच्या 2017 च्या निवडणुकीत क्लस्टरच्या मुद्यावरून सत्तेत आली मात्र अद्याप कोणतीही वीट रोवली नाही. पालकमंत्री मंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडको आणि ठाणे महापालिका यामध्ये सामंजस्य करार करत मंत्री एकनाथ शिंदे यांच्या समवेत स्वाक्षऱ्या झाल्या होत्या आणि आता क्लस्टरचा मार्ग मोकळा झाला असून क्लस्टर होणार असा दावा सत्ताधारी शिवसेनेच्या वतीने करण्यात आला होता, याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष विक्रम खामकर यांनी ‘क्लस्टर पुन्हा गाजर’ या आशयाचे बॅनर लावून अजून किती वर्षे क्लस्टर च्या मुद्यावरून निवडणूक लढवणार असा सवाल यावेळी खामकर यांनी उपस्थित केला.

निवडणुका आल्या की क्लस्टरचे गाजर ठाणेकरांना दिले जात असल्याचा टोला यावेळी खामकर यांनी लगावला. एकप्रकारे ठाणेकरांची दिशाभूल करण्याचे काम सत्ताधारी आणि पालिका प्रशासन करत आहे, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेस विक्रम खामकर यांनी केला आहे. या पोस्टरमुळे पुन्हा ठाण्यात महविकास आघाडीत बिघाडी झालीय असेच समोर आलेय.तर, हा बॅनर ठाणेकरांचे लक्ष वेधत आहे.

पाहा व्हिडीओ

इतर बातम्या :

भाजपचा शनिवारी होणारा मोर्चा ऐनवेळी स्थगित, कार्यकर्त्यांना नोटीसा देऊन अडचणीत आणण्याचा प्रयत्न-भाजप

Kalyan : बांधकाम परवानगीमधील अनियमितता केडीएमसीच्या पाच माजी आयुक्तांसह 18 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Thane Shivsena and NCP differences show again on issue of Cluster NCP youth place banner against Thane Municipal Corporation

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.