‘त्याच्या’साठी नगमा ‘सनम’ बनून दीड महिना पाकिस्तानात राहिली, अखेर असं समोर आलं सत्य

Thane Young Lady Leave in Pakistan : सिमा हैदर प्रकरणासारखं प्रकरण ठाण्यात समोर आलं आहे. ठाण्यातील तरूणी पाकिस्तानमध्ये जाऊन राहिली आहे त्यामुळे ठाण्यासह महाराष्ट्रात याची चर्चा होत आहे. सोशल मीडियावर झाली ओळख ठाण्यातील तरुणी पाकिस्तानात का गेली? वाचा...

'त्याच्या'साठी नगमा 'सनम' बनून दीड महिना पाकिस्तानात राहिली, अखेर असं समोर आलं सत्य
वृद्ध बापाने मुलाला संपवलं
Follow us
| Updated on: Jul 24, 2024 | 1:47 PM

देशभर गाजलेलं सीमा हैदर प्रकरण आठवतं का? प्रेम माणसाला काय- काय नाही करायला लावत… पाकिस्तानची रहिवासी असणारी सीमा हैदर सचिनवरील प्रेमाखातिर तिच्या मुलांना घेऊन भारतात आली आणि अन् तिने सचिनशी लग्नगाठ बांधली. असंच काहीसं घडलंय आपल्या ठाण्यात… ठाण्यातही सीमा हैदर सारखं प्रकरण समोर आलं आहे. ठाण्यातील तरूणीची सोशल मीडियावरून पाकिस्तानातील तरूणाशी ओळख झाली. त्यानंतर तिने बनावट कागदपत्र बनवले अन् ही ठाण्यातील तरुणी थेट पाकिस्तानात पोहोचली.

नेमकं काय घडलं?

ठाण्याच्या वर्तकनगरमधील नगमा नूर मकसूद अली हिची इन्स्टाग्रामवरून पाकिस्तानमधील तरूणाशी ओळख झाली. हळूहळू या ओळखीचं रुपांतर प्रेमात झालं. मग या दोघांनी भेटायचं ठरवलं. पण हे दोघेही वेगवेगळ्या देशात राहत होते. नगमा नूर मकसूद अली ही ठाण्यात होती तर तिचा प्रियकर पाकिस्तानात… मग नगमाने बनावट कागदपत्रांचा आधार घेतला. नगमाने तिचं नाव बदलत सनम खान केलं. आता सनम खान या नावाने तिने बनावट कागदपत्र तयार केले. पासपोर्ट आणि व्हीजा पण तिने तयार केला. याच कागदपत्रांच्या आधारे ती तिच्या मुलीला घेऊन पाकिस्तानमध्ये गेली.

अन् ती पाकिस्तानात पोहोचली

ठाण्यातील नगमा नूर मकसूद या तरुणीने ठाणे ते पाकिस्तान प्रवास करत पाकिस्तानातील एबोटाबाद इथं ती पोहोचली. तिथं जावून नगमाने तिच्या प्रियकराशी लग्न केलं. पाकिस्तानमधील रावलपिंडी या भागात दीड महिने नगमा राहिली. 17 जुलैला पुन्हा भारतात आली. भारतात परत आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आलं. ही तरुणी आली ठाणे पोलिसांना हे कळताच त्यांनी या तरुणीला बोलावून चौकशी सुरु केलीये.

नगमा नूर मकसुद अली उर्फ सनम खान असं या तरुणीचे नाव आहे. हे सगळं मे 2023 ते 2024 या काळात घडलं आहे. पोलिसांनी आता ठाण्यातील नगमा नूर मकसूद उर्फ सनम खान हिला ताब्यात घेतलं आहे. तिची कसून चौकशी सुरु आहे. ठाणे पोलीस सध्या नगमा नूर मकसूदच्या नातेवाईकांचाही तपास करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.