Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bhayander Murder : मीरा-भाईंदरमध्ये हॉटेलमध्ये सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला

जखमी महिला, तिचा पती आणि मुलगी गेल्या तीन दिवसापासून हॉटेल सीजनमध्ये राहत होते. मात्र तीन दिवसापासून ते रुमच्या बाहेर आलेच नाहीत. आज सकाळी हॉटेलच्या मॅनेजरने त्यांना रुम खाली करण्यास सांगितले. त्यानंतर सकाळी 10 वाजता महिलेचा पती हॉटेलमधून निघून गेला. पती हॉटेलमधून निघून गेल्यानंतर रुममधून महिलेचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला.

Bhayander Murder : मीरा-भाईंदरमध्ये हॉटेलमध्ये सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळला
मीरा-भाईंदरमध्ये हॉटेलमध्ये सात वर्षाच्या मुलीचा मृतदेह आढळलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 30, 2022 | 11:31 PM

मीरा भाईंदर : काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या सीजन हॉटल (Season Hotel)मध्ये एक सात वर्षीय मुलीचा मृतदेह (Deadbody) आढळून आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मुलीची आईही गंभीर जखमी (Injured) अवस्थेत खाली पडतलेली आढळली. तीन दिवांपूर्वी महिला आपल्या नवऱ्यासोबत हॉटेलमध्ये रुम घेऊन राहण्यासाठी आली होती. आज सकाळी जवळपास दहा वाजता नवरा अचानक हॉटेलमधून निघून गेला. त्यानंतर हॉटेलचे कर्मचारी रुममध्ये गेले असता मुलीचा मृतदेह आणि गंभीर जखमी महिला आढळून आली. यानंतर काशीमीरा पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच काशीमीरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला. मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला तर जखमी आईला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

महिलेचा ओरडण्याचा आवाज ऐकून कर्मचाऱ्याने रुमचा दरवाजा उघडला

जखमी महिला, तिचा पती आणि मुलगी गेल्या तीन दिवसापासून हॉटेल सीजनमध्ये राहत होते. मात्र तीन दिवसापासून ते रुमच्या बाहेर आलेच नाहीत. आज सकाळी हॉटेलच्या मॅनेजरने त्यांना रुम खाली करण्यास सांगितले. त्यानंतर सकाळी 10 वाजता महिलेचा पती हॉटेलमधून निघून गेला. पती हॉटेलमधून निघून गेल्यानंतर रुममधून महिलेचा ओरडण्याचा आवाज येऊ लागला. ही महिला वाचवा वाचवा अशी ओरडत होती. महिलेचा आवाज ऐकून हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी रुमचा दरवाजा खोलून आत प्रवेश केला. आतमध्ये महिला जखमी अवस्थेत पडली होती तर तिची सात वर्षाची मुलगी मृतावस्थेत पडली होती. त्यानंतर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ काशीमीरा पोलीस ठाण्यात हत्येची माहिती दिली. काशीमीरा पोलिसांनी घटनास्थळी दाखल प्रकरणाचा तपास सुरु केला. मुलीचा मृतदेह शवविच्छदेनासाठी रुग्णालयात पाठवला तर आईला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काशीमीरा पोलीस महिलेच्या पतीचा शोध घेत आहेत. आरोपीला अटक केल्यानंतरच त्याने हे कृत्य का केले ते स्पष्ट होईल. (The body of a seven years old girl was found in a hotel in Mira Bhayandar)

हे सुद्धा वाचा

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल.
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?
'त्या' जखमा नेमक्या कोणत्या? रिपोर्टनंतर आरोपांची 'दिशा' बदलली?.
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका
एखादा मंत्री असं म्हणतो म्हणजे तालिबानी राज्य आहे..; राऊतांची टीका.
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?
विधिमंडळाच्या समितीत भुजबळ अन् मुंडेंना स्थान नाही, दादांनी का डावललं?.
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य
'हीच ती वेळ... एका पराभवाने खचणार नाही', शरद पवारांचं मोठं वक्तव्य.
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं..
लंडनच्या मित्राचा फोन अन् दिशाने सगळंच संपवलं...
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली
त्यानं सांगितलं की, देशमुखांना असं मारा की.., पोलिसांसमोर घुलेची कबुली.
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात
'वाघ्या'ला ऐतिहासिक महत्त्व की दंतकथा? संभाजी भिडेंवर ठाकरेंचा घणाघात.
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब
देशमुखांच्या छातीवर उडी अन् रक्ताची उलटी; आरोपींचा थरकाप उडवणारा जबाब.
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार
संभाजीनगरच्या कुटुंबांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच थाटले संसार.