Kalyan Crime : घरफोडीचे 41 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक

नारायण हा सराईत चोरटा असून त्याने त्याच्या विरोधात मुंबई ठाणे परिसरात घरफोड्या केल्या होत्या. विशेष म्हणजे घरफोड्या करताना दुकानाचे घराचे टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवून घेतली होती. मुंबई ठाणे परिसरात त्याने तब्बल 41 घरफोड्या केल्या असून दोन गुन्ह्यांची कबुली त्याने दिल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली.

Kalyan Crime : घरफोडीचे 41 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
घरफोडीचे 41 गुन्हे दाखल असलेल्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांकडून अटक
Follow us
| Updated on: Mar 11, 2022 | 5:03 PM

कल्याण : मुंबई ठाणे परिसरात तब्बल 41 घरफोड्या करणाऱ्या सराईत चोरट्याला कोळसेवाडी पोलिसां (Kolsewadi Police)नी अटक केली आहे. नारायण तेवर असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. आरोपीने घरफोड्या (Burglary) करताना टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवली होती. नारायण हा मूळचा तामिळनाडूमधील रहिवासी आहे. नारायण गेली अनेक वर्ष मुंबई, ठाणेसह आसपासच्या भागात घरफोड्या सारखे गुन्हे करत होता. मागील तीन महिन्यांपूर्वी एका गुन्ह्यात शिक्षा भोगून जेलमधून परतला होता. कल्याणमधील एका दुकानातील चोरी प्रकरणाचा तपास करताना पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. (The burglar was arrested by the kolsewadi police)

आनंदवाडी परिसरात सापळा रचून आरोपीची गठडी वळली

काही दिवसांपूर्वी कल्याण कोळसेवाडी परिसरात एका किराणा दुकानामध्ये चोरी झाल्याची घटना घडली होती. कोळसेवाडी पोलिसांचे गस्ती पथक गस्त घालत असताना त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले. पोलिसांना तात्काळ घटनास्थळी तपास सुरू केला. पोलिसांना मोबाईल आढळून आला. सदर मोबाईल व परिसररातील सीसीटीव्हीच्या आधारे या चोरीचा तपास कोळसेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बशीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय हरिदास बोचरे यांच्या टीमने सुरू केला. तपासादरम्यान सदर चोरटा कल्याण आनंदवाडी परिसरात फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आनंदवाडी परिसरात सापळा रचत नारायण तेवर या सराईत चोरट्याला अटक केली.

ठाणे, मुंबईत तब्बल 41 घरफोड्या केल्या

नारायण हा सराईत चोरटा असून त्याने त्याच्या विरोधात मुंबई ठाणे परिसरात घरफोड्या केल्या होत्या. विशेष म्हणजे घरफोड्या करताना दुकानाचे घराचे टाळे तोडण्यासाठी विशेष कटावणी बनवून घेतली होती. मुंबई ठाणे परिसरात त्याने तब्बल 41 घरफोड्या केल्या असून दोन गुन्ह्यांची कबुली त्याने दिल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांनी दिली. त्याच्याकडून रोख रक्कम व दोन सोन्याच्या अंगठ्या असा एकूण 32 हजार 750 मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. (The burglar was arrested by the kolsewadi police)

इतर बातम्या

दिराच्या प्रेमात आकंठ बुडाली वहिनी, सासरच्या विरोधामुळे सहा वर्षांच्या लेकासह पोलिसात धाव

जुन्या वादातून तीन सख्ख्या भावांवर हल्ला, दोघांचा मृत्यू, बारा वर्षांनी आरोपीला शिक्षा

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.