सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, शिंदे-ठाकरे गटात पुन्हा वाद; यांना मारहाण केल्याचा आरोप

पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. पोलीस दबावाखाली काम करत आहेत. यासाठी ठिय्या आंदोलन ठाकरे गटाची महिला बसली होती.

सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट, शिंदे-ठाकरे गटात पुन्हा वाद; यांना मारहाण केल्याचा आरोप
Follow us
| Updated on: Apr 04, 2023 | 10:49 AM

ठाणे : गेल्या नऊ महिन्यापासून अशीच दादागिरी केली जात असल्याचा आरोप ठाकरे गटाने केला आहे. काँग्रेस प्रवक्याला मारहाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण तसेच पत्रकाराला धमकी अशी काही प्रकरणं घडत आहेत. पोलीस मुख्यमंत्री यांच्या दबावाखाली काम करत आहेत. या घटनेचे जबाबदार मुख्यमंत्री स्वतः असल्याचा आरोपही ठाकरे गटाकडून केला जातो. आमच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे या महिलेला मारहाण झाली. पोलीस गुन्हा दाखल करत नाहीत. पोलीस दबावाखाली काम करत आहेत. यासाठी ठिय्या आंदोलन ठाकरे गटाची महिला बसली होती.

ठाण्यातील कासार वडवली येथे शिवसेना शिंदे गट आणि ठाकरे गटामध्ये परत एकदा सोमवार संध्याकाळी वाद पाहायला मिळाला. त्याचं कारण होतं सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट. ठाकरे गटाची रोशनी शिंदे या महिलेला शिंदे गटाकडून मारहाण करण्यात आली, असा आरोप ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी केला.

हे सुद्धा वाचा

या महिलेला मारहाण केल्याचा आरोप

ठाण्यातील कासार वडवली पोलीस ठाण्यात मध्यरात्री ठिय्या आंदोलन करण्यात आले. आंदोलन करणारे हे सगळे ठाकरे गटाचे महिला आणि पुरुष पदाधिकारी व कार्यकर्ते आहेत. शिंदे गटाची काही महिलांनी ठाकरे गटाची रोशनी शिंदे या महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे. मारहाणीचा कारण आहे सोशल मीडियावरील वादग्रस्त पोस्ट.

वादग्रस्त कमेंट केल्यावरून वाद

सोशल मीडियावर शिंदे गटाच्या एका महिलेनी पोस्ट केलं होतं. त्यावर ठाकरे गटाची रोशनी शिंदे यांनी वादग्रस्त कमेंट केलीय. यावर रोशनी शिंदे यांनी माफीही मागितली. तरी कमेंटमुळे नाराज शिंदे गटाच्या काही महिलांनी रोशनी शिंदे या महिलेला मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन

ठाकरे गटाच्या महिलांचा आरोप आहे की, रोशनी शिंदे यांना मारहाण केल्यानंतरही कासार वडवली पोलीस लेखी तक्रार घेतली नाही. मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करावे लागत आहे. पोलिसांनी म्हटले की त्या महिलेनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. मेडिकल रिपोर्ट आल्यावर पुढील कारवाई होणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.