डोक्यात ड्रम अडकलेल्या बिबट्याची अखेर दोन दिवसांनंतर सुटका, संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये उपचार

बिबट्याच्या पिल्लाच्या डोक्यात पाणी पिताना पाण्याची कॅन अडकल्याचा प्रकार ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळच्या गोरेगावमधून समोर आला आहे. या पिल्लाचा अखेर 48 तासांनी शोध घेण्यात वनविभागाला यश आलंय. वनविभाग आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पॉज संस्थेनं या बिबट्याच्या पिल्लाची सुखरूप सुटका केली आहे.

डोक्यात ड्रम अडकलेल्या बिबट्याची अखेर दोन दिवसांनंतर सुटका, संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये उपचार
बिबट्याच्या डोक्यात ड्रम अडकला
Follow us
| Updated on: Feb 15, 2022 | 10:21 PM

ठाणे : बिबट्याच्या (Leopard) पिल्लाच्या डोक्यात पाणी पिताना (Drinking water) पाण्याची कॅन अडकल्याचा प्रकार ठाणे (thane) जिल्ह्यातील बदलापूरजवळच्या गोरेगावमधून समोर आला आहे. या पिल्लाचा अखेर 48 तासांनी शोध घेण्यात वनविभागाला यश आलंय. वनविभाग आणि प्राण्यांसाठी काम करणाऱ्या पॉज संस्थेनं या बिबट्याच्या पिल्लाची सुखरूप सुटका केली आहे. सुटकेनंतर या बिबट्याच्या बछड्याला उपचारासाठी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये दाखल करण्यात आले आहे. बिबट्याच्या पिल्लाच्या डोक्यात पाण्याची बाटली अडकल्याचा हा प्रकार एका पर्यटकाने व्हिडीओ शूट करून समोर आणला होता. साधारण एक ते दीड वर्षाचं हे पिल्लू गोरेगावच्या एका रिसॉर्टच्या परिसरात रविवारी रात्री पाणी पिण्यासाठी आलं होतं. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकलं. याबाबतची माहिती मिळताच वनविभाग, संजय गांधी नॅशनल पार्क, प्लॅन्ट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) यांच्या माध्यमातून या पिल्लाचा शोध घेण्यात आला, अखेर हे पिल्लू आढळून आल्यानंतर त्यांनी या पिल्लाच्या डोक्यात अडकलेला ड्रम सुखरुप काढला.

पाणी पिण्याच्या प्रयत्नामध्ये डोक्यात ड्रम अडकला

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, साधारण एक ते दीड वर्षाचं हे पिल्लू गोरेगावच्या एका रिसॉर्टच्या परिसरात रविवारी रात्री पाणी पिण्यासाठी आलं होतं. मात्र यावेळी एका पाण्याच्या कॅनमध्ये त्याचं डोकं अडकलं. याबाबतची माहिती मिळताच वनविभाग, संजय गांधी नॅशनल पार्क आणि प्लॅन्ट अँड ऍनिमल वेल्फेअर सोसायटी (पॉज) यांच्या माध्यमातून या पिल्लाचा शोध घेण्यात आला, अखेर हे पिल्लू आढळून आल्यानंतर त्यांनी या पिल्लाच्या डोक्यात अडकलेला ड्रम सुखरुप बाहेर काढला. डोक्यात ड्रम अडकल्याने गेल्या दोन दिवसांपासून या पिल्लाला काहीही खाता -पिता आले नाही. त्यामुळे हे पिल्लू दोन दिवसांपासून उपाशीच होते. अखेर आज संध्याकाळी सातच्या सुमारास गोरेगाव पाडा भागात हे पिल्लू आढळून आलं. यानंतर त्याला बेशुद्ध करून त्याच्या डोक्यातली पाण्याची कॅन काढण्यात आल्याची माहिती पॉज संस्थेचे प्रमुख निलेश भणगे यांनी दिली .

पिल्लू दोन दिवसांपासून उपाशी

दरम्यान, या बिबट्याच्या पिल्लाची वैद्यकीय तपासणी केली असता, ते 2 दिवस अन्नपाण्यावाचून फिरत असल्यानं डिहायड्रेटेड असल्याचं आणि काहीसं अशक्त झाल्याचं संजय गांधी नॅशनल पार्कच्या डॉक्टर्सच्या लक्षात आलं. त्यामुळं या बिबट्याच्या पिल्लाला उपचारांसाठी संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये नेण्यात आलं आहे. तिथे उपचार करून ठणठणीत झाल्यानंतर त्याची नैसर्गिक अधिवासात मुक्तता केली जाणार आहे. बिबट्याचं हे पिल्लू जिवंत सापडल्यामुळे प्राणीप्रेमींकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

‘हिंदूहृदयसम्राट नाही, मराठी हृदयसम्राट म्हणा’, घाटकोपरमधील बॅनर आणि घोषणाबाजीनंतर राज ठाकरेंचे मनसैनिकांना आदेश…

‘राऊतांनी मोठा गौप्यस्फोट करण्याचं सांगून पुरती निराशा केली, 420 चा गुन्हा दाखल करा’, मनसेचा जोरदार टोला

दहावी, बारावीच्या परीक्षेसाठी केंद्रांची संख्या वाढवली; वर्षा गायकवाड यांनी सांगिलला परीक्षेचा संपूर्ण प्लॅन

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.