Mahesh Tapase : बीएसयूपी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी आक्रमक, सीबीआय आणि ईडीकडे भ्रष्टाचाराची तक्रार करणार ?

शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील विविध प्रकल्पात बाधित नागरिकांच्या पुनर्वसन प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी कल्याण कचोरे भागातील बीएसपी अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतींचे पाहणी केली. यावेळी तपासे यांनी लाभार्थ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

Mahesh Tapase : बीएसयूपी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी आक्रमक, सीबीआय आणि ईडीकडे भ्रष्टाचाराची तक्रार करणार ?
बीएसयूपी प्रकल्पाबाबत राष्ट्रवादी आक्रमक
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 6:00 PM

कल्याण : बीएसयूपी प्रकल्पा (BSUP Project)तील घरांमधून खिडकी, दरवाजे, लिफ्ट, इतकेच नाही तर इलेक्ट्रीकल्स वस्तू चोरीस गेल्या. दहा वर्षापासून लाभार्थ्यांना घरे मिळाली नाहीत. या संदर्भात सर्व माहिती घेऊन भ्रष्टाचार (Corruption) झाला असेल तर याबाबत ठाणे एसीबी, सीबीआय आणि ईडीकडे तक्रार (Complain) करणार अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे. कल्याण पूर्व परिसरातील कचोरे येथे बीएसयूपी प्रकल्पांतर्गत शहरी गरीबांसाठी घरे बांधली आहेत. त्याची पाहणी आज तपासे यांनी केली. महेश तपासे यांच्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी शमीम शेख आणि स्थानिक समाजसेवक युसूफ मेमन हे देखील उपस्थित होते. (The NCP will lodge a complaint of corruption with the CBI and ED regarding the BSUP project in kalyan)

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तापलाय

कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न तापू लागला आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कल्याण डोंबिवलीमध्ये विविध ठिकाणी कोट्यवधींचा निधी खर्च करत गरिबांसाठी घरकुल योजना राबवण्यात आली. या इमारती उभ्या राहिल्या खऱ्या मात्र अद्यापही शेकडो  पात्र लाभार्थी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत आहेत. एकीकडे बाधित पात्र लाभार्थी पुनर्वसनाच्या प्रतिक्षेत असताना दीड वर्ष झाली या इमारतींच्या खिडक्या, दरवाजे, लिफ्ट, खोल्यांमधील वायरिंग देखील चोरट्यांनी चोरून नेली आहे. शिवसेना, भाजप, मनसे, काँग्रेस पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील विविध प्रकल्पात बाधित नागरिकांच्या पुनर्वसन प्रश्नी आक्रमक भूमिका घेतली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते महेश तपासे यांनी कल्याण कचोरे भागातील बीएसपी अंतर्गत उभारण्यात आलेल्या इमारतींचे पाहणी केली. यावेळी तपासे यांनी लाभार्थ्यांची भेट घेत त्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

…तर सीबीआय आणि ईडीकडे तक्रार करु

याबाबत बोलताना तपासे यांनी कल्याण कचोरे येथे असलेल्या बीएसयूपी प्रकल्पांच्या इमारतींची दुरवस्था झाली आहे. या ठिकाणी अनेक पात्र लाभार्थी आजही घरांच्या प्रतिक्षेत आहेत. हा विषय केंद्रातील संबंधित मंत्र्यापर्यंत पोहचवणार, इमारत बनवून 10 वर्ष झाली मात्र पात्र लाभार्थी अद्याप घरांच्या प्रतीक्षेत आहेत याचा अर्थ दाल मे कूछ काला है. दाल मे काला काय आहे याचा शोध घेण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न करू, गरज वाटल्यास आणि भ्रष्टाचार झाला असेल तर स्थानिक प्रशासन सीबीआय आणि ईडीकडे याची तक्रार करणार असं महेश तपासे यांनी सांगितले. (The NCP will lodge a complaint of corruption with the CBI and ED regarding the BSUP project in kalyan)

इतर बातम्या

Ulhasnagar Crime : जन्मठेपेच्या फरार कैद्याला 23 वर्षांनी बेड्या, उल्हासनगर क्राईम ब्रॅंचची सापळा रचून कारवाई

ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला?, विधेयक मंजूर झाल्याने काय होणार?; वाचा, तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तरे

Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.