छताचे प्लास्टर निघाले, भिंतीला तडे; अशी आहे मनपा शाळेची दुरावस्था
डोंबिवली आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा आहे. या शाळेत 200 गरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतायत. मात्र या शाळेची दुरावस्था झाल्याने या विद्यार्थ्यांची सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
ठाणे : डोंबिवलीतल्या आयरे गावातील पालिकेच्या शाळेची अवस्था धोकादायक अवस्थेत आहे. शाळेत शिकणाऱ्या २०० विद्यार्थ्यांची सुरक्षितता ऐरणीवर आली आहे. छताचे प्लास्टर निघाले. भिंतीच्या पिलरला तडे गेलेत. प्रसाधनगृहाची अवस्था प्रशासनाने प्रसाधनगृहांची तात्पुरते डागडुजी केली. मात्र इमारतीची देखभाल दुरुस्ती एप्रिल महिन्यात करण्यात असल्याचे उत्तर देण्यात आले. महापालिकेचा वेळकाढूपणा पाहता मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक आणि शिक्षक वर्गात व्यक्त केली जात आहे. जीवितहानी झाल्यानंतरच पालिका प्रशासन जागा होणार का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे. डोंबिवली आयरे गावात कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा आहे.
बांधकाम २० वर्षांपूर्वीचे
या शाळेत 200 गरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतायत. मात्र या शाळेची दुरावस्था झाल्याने या विद्यार्थ्यांची सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.एकीकडे शालेच्या स्लॅबचे प्लास्टर पडतेय. भिंतीला तडे गेलेत तर दुसरीकडे प्रसाधान गृहाची दुरवस्था झाली आहे. याबाबत शाळेच्या मुख्याध्यापकांनी पालिका प्रशासनाकडे वारंवार दुरुस्तीची मागणी करत पाठपुरावा केला. मात्र, महापालिका प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने पालकवर्गात भीतीचे वातावरण आहे. मोठी दुर्घटना घटनेची शक्यता वर्तवली जात आहे.
पालिका प्रशासन केव्हा जाग होणार?
डोंबिवली पूर्वेकडील आयरे गावात कल्याण-डोंबिवली महापालिकेची लालबहादूर शास्त्री शाळा ही प्राथमिक शाळा आहे. या शाळेत पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग आहेत. यापूर्वी परिसरातील सुमारे 200 गरीब विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेतायत. या शाळेचे इमारती वीस वर्षांपूर्वी बांधण्यात आली आहे. या इमारतीची देखभाल दुरुस्तीअभावी दुरावस्था झाली आहे. वर्गातील छताचे प्लास्टर कोसळत आहे. तर पिलरला देखील तडे गेलेत आहेत. दुसरीकडे विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी असणारे प्रसाधनगृहाची देखील दुरावस्था झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
याबाबत शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा देशमुख यांनी महापालिका प्रशासनाकडे याबाबत वारंवार तक्रारी करत लक्ष वेधले. मात्र पालिका प्रशासनाने प्रसाधनगृहांची तात्पुरते डागडुजी केली. इमारतीची देखभाल दुरुस्ती एप्रिल महिन्यात करण्यात येईल, असे उत्तर दिले. विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना याच इमारतीत शिक्षण घ्यावे लागत आहे. मोठी दुर्घटना घडण्याची भीती पालक वर्गात आणि शिक्षक वर्गात व्यक्त केली जात आहे. जीवितहानी झाल्यानंतरच पालिका प्रशासन जागा होणार का असा प्रश्न सामाजिक कार्यकर्त्यांकडून उपस्थित केला जात आहे.