Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कळव्यात करवा चौथला दुसरी थेट घरी आली, नवऱ्यानं पहिलीला जीवंत जाळलं, गर्भवतीचं काय चुकलं?

आरोपी अनिल चौरसिया हा आपल्या पत्नीसोबत कळव्यातील मफतलाल कॉलनीत राहत होता. काही महिन्यांनंतर त्याने डोंबिवलीतील निहारिका नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेऊन दुसरा विवाह केला.

कळव्यात करवा चौथला दुसरी थेट घरी आली, नवऱ्यानं पहिलीला जीवंत जाळलं, गर्भवतीचं काय चुकलं?
गर्भवती पत्नीला पतीने जिवंत जाळले
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 6:44 PM

ठाणे : ठाण्यातील कळवा भागातील मफतलाल कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून एका गर्भवती महिलेवर रॉकेल टाकून जिवंत जाळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेत महिलेच्या पोटातील 6 महिन्याच्या अभ्रकाचा मृत्यू झाला आहे. तर सदर महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी आरोपी पती अनिल चौरसियाला पोलिसांनी अटक केली असून त्याच्या विरोधात कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The pregnant wife was burnt alive by her husband; accused arrest by the police)

दुसऱ्या लग्नात अडथळा ठरत असल्याने पेटवले

आरोपी अनिल चौरसिया हा आपल्या पत्नीसोबत कळव्यातील मफतलाल कॉलनीत राहत होता. काही महिन्यांनंतर त्याने डोंबिवलीतील निहारिका नावाच्या तरुणीसोबत प्रेमसंबंध ठेऊन दुसरा विवाह केला. याबाबत मे महिन्यात पहिली पत्नी शोभावती हिला कळल्यानंतर दोघा पती पत्नीचे नेहमीच वाद होऊ लागले. त्यानंतर करवाचौथ सणाला आरोपीची दुसरी पत्नी निहारिका आरोपीच्या घरी आली आणि पहिली पत्नी शोभावतीला आम्ही लग्न केलं असल्याचं सांगितलं. ही गोष्ट पहिल्या पत्नीला समजताच त्यांच्यात आणखी जोरदार वाद होऊ लागले. त्यानंतर 31 ऑक्टोबर रोजी हा वाद एवढा विकोपाला गेला की, आरोपीने पहिल्या पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला पेटवून दिले. या घटनेत पीडित पत्नीची प्रकृती गंभीर असून तिच्यावर जे जे रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर महिलेच्या गर्भातील 6 महिन्याच्या गर्भाचा गर्भातच मृत्यू झाला आहे. कळवा पोलिसांनी तात्काळ आरोपी पतीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला 4 नोव्हेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

लग्नाच्या तोंडावर दुसऱ्याच तरुणीसोबत पळाला, नवरदेवावर गुन्हा

राजस्थानातील जोधपूरमध्ये लग्नाच्या 15 दिवस आधी नवरदेवाने आपल्या वधूला सोडून दुसऱ्या मुलीसोबत पळ काढला. नववधूच्या कुटुंबीयांच्या तक्रारीवरून पोलिसांनी नवरदेव आणि त्याच्यासोबत पळालेल्या तरुणीचा शोध घेतला. पोलिसांनी नवरदेवाला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्यासोबत पळून गेलेल्या तरुणीने त्याच्या कुटुंबासोबत राहण्यास संमती दर्शवली. तर दुसरीकडे वधूच्या कुटुंबीयांनी त्याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत.

जोधपूरमध्ये रतनडाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या तरुणीचा साखरपुडा तीन वर्षांपूर्वी बादल नायक याच्याशी झाला होता. येत्या 14 नोव्हेंबरला दोघं लग्नबंधनात अडकणार होते. दोघांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालले होते. गेल्या 27 तारखेला लग्नाचे काही विधीही पार पडले. त्याचबरोबर वधूच्या कुटुंबातही लग्नाचे काही विधी सुरु होते. मात्र यावेळी बादल दुसऱ्याच मुलीसोबत पळून गेला. (The pregnant wife was burnt alive by her husband; accused arrest by the police)

प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार
प्रशांत कोरटकर जामीनासाठी अर्ज करणार.
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक
आमदारांच्या घरांसमोर टेंभे पेटवणार; कर्जमाफीच्या मुद्यावर कडू आक्रमक.
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा
लाडक्या बहिणींमुळे तिजोरीवर भार आलाय, त्यामुळे..; शिरसाटांचा खुलासा.
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला
कर्जमाफी देता येत नाही तर...; संजय राऊतांचा अजित पवारांना टोला.
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी
स्वत:च्याच कारमध्ये मृतावस्थेत आढळला पोलीस कर्मचारी.
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण
ठाणे का टायगर, आखो मे अंगार.. ; शिंदेंच्या समर्थनार्थ शहाजीबापूंचं गाण.
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार
मनसे मेळावा; शिवतीर्थावर राज ठाकरेंची तोफ धडाडणार.
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार
संघ बाह्य आणि आंतरिक दृष्टीसाठी काम करतो; पंतप्रधान मोदींचे गौरवोद्गार.
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात
'आपल्या सर्वांना...', पंतप्रधान मोदींची मराठीतून भाषणाला सुरुवात.
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत
शुद्ध सात्विक प्रेम हीच संघाची प्रेरणा - मोहन भागवत.