Ulhasnagar Murder : आधी महिलेची हत्या केली, मग मृतदेह 24 तास गाडीत फिरवला; मृतदेहाची विल्हेवाट लावताना बिंग फुटलं

खाजेकर काही वर्षांपूर्वी औरंगाबादला कार्यरत होता. त्यावेळी त्याचे या महिलेशी अनैतिक संबंध जुळले. त्यानंतर त्याची ठाण्यात बदली झाल्यावर त्याने तिच्याशी असलेले संबंध तोडले होते. मात्र या महिलेनं सचिन खाजेकर याच्याकडे मला तुझ्या घरी घेऊन चल, मी तुला दिलेले पैसे परत दे, असा तगादा लावला होता. ही महिला सतत ब्लॅकमेल करत असल्यानं खाजेकर तिला त्रासला होता.

Ulhasnagar Murder : आधी महिलेची हत्या केली, मग मृतदेह 24 तास गाडीत फिरवला; मृतदेहाची विल्हेवाट लावताना बिंग फुटलं
आधी महिलेची हत्या केली, मग मृतदेह 24 तास गाडीत फिरवलाImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Jun 17, 2022 | 9:04 PM

उल्हासनगर : अनैतिक संबंधातून एका पोलिसानेच महिलेची हत्या (Murder) केल्याची घटना उल्हासनगरमध्ये उघडकीस आली आहे. याप्रकरणी आरोपी पोलिसासह त्याच्या साथीदाराला हिललाईन पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. सचिन खाजेकर (Sachin Khajekar) असे आरोपी पोलिसाचे तर कल्पेश खैरनार असे त्याच्या साथीदाराचे नाव आहे. खाजेकर हा विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. सध्या खाजेकर ठाणे पोलीस मुख्यालयात पोलीस नाईक पदावर कार्यरत होता. त्याचे महिलेशी अनैतिक संबंध होते. ही महिला वारंवार त्याला त्रास देत होती. यामुळे महिलेपासून सुटका मिळवण्यासाठी त्याने तिचा काटा काढला. मात्र मृतदेहाची विल्हेवाट लावताना जाळ्यात अडकला.

महिला सतत ब्लॅकमेल करत होती

खाजेकर काही वर्षांपूर्वी औरंगाबादला कार्यरत होता. त्यावेळी त्याचे या महिलेशी अनैतिक संबंध जुळले. त्यानंतर त्याची ठाण्यात बदली झाल्यावर त्याने तिच्याशी असलेले संबंध तोडले होते. मात्र या महिलेनं सचिन खाजेकर याच्याकडे मला तुझ्या घरी घेऊन चल, मी तुला दिलेले पैसे परत दे, असा तगादा लावला होता. ही महिला सतत ब्लॅकमेल करत असल्यानं खाजेकर तिला त्रासला होता. त्यामुळं त्यानं तिला उल्हासनगरला बोलावून घेत त्याच्या व्हॅगनआर कारमध्ये बसवलं आणि गळा दाबून तिला ठार मारलं. यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी खाजेकर हा गाडीतच मृतदेह घेऊन नाशिक, भिवंडी, कल्याण फिरून आला. मात्र त्याला मृतदेहाची विल्हेवाट लावता आली नाही. त्यामुळं त्याने त्याचा मेव्हणा कल्पेश खैरनार याला हा प्रकार सांगून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी पैसे देऊन माणूस आणायला सांगितलं.

मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी नेमका खबऱ्याला फोन केला अन् फसला

कल्पेश खैरनार यानं या कामासाठी ज्याला फोन केला, तो नेमका पोलिसांचा खबरी निघाला आणि त्याने विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याच्या अधिकारी प्रियांका सादळकर यांना याबाबतची माहिती दिली. त्यानुसार त्यांनी तिथे धाव घेतली असता पाईपलाईन रोडवरील मिरची ढाब्याजवळ पोलीस प्लेट असलेल्या एका कारमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. यानंतर सादळकर यांनी तिथे धाव घेत हा प्रकार उघड केला. याप्रकरणी पोलिसांनी ठाणे पोलीस दलात कार्यरत असलेला पोलीस कर्मचारी सचिन खाजेकर याच्यासह कल्पेश खैरनार याला ताब्यात घेतलं. चौकशीदरम्यान अनैतिक संबंधांमुळे आपण या महिलेची हत्या केल्याची कबुली सचिन खाजेकर याने दिली. यानंतर हिललाईन पोलिसांनी सचिन खाजेकर आणि कल्पेश खैरनार यांच्याविरोधात हत्या, पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करणे असे गुन्हे दाखल करत त्यांना बेड्या ठोकल्याची माहिती उल्हासनगर परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त प्रशांत मोहिते यांनी दिली. (The woman was strangled to death by police in an immoral relationship)

हे सुद्धा वाचा

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.