कल्याण : कल्याण रेल्वे स्थानकातील फलाटावर दोन ट्रेन उभ्या होत्या. एका ट्रेनमध्ये एक महिला मोबाईलवर बोलत होती. दोन चोरट्यांची नजर त्या महिलेवर गेली. या चोरट्यांनी संधी साधत एका ट्रेनमधून दुसऱ्या ट्रेनमध्ये बसलेल्या महिलेचा मोबाईल (Mobile) हिसकावून पळ काढला. सीसीटीव्ही (CCTV)च्या सहाय्याने कल्याण जीआरपीच्या मदतीने दोन्ही चोरट्यांना मुंब्रा येथून अटक (Arrest) केली आहे. हे दोघे सराईत चोर असून आतापर्यंत किती चोरी केल्या याचा तपास सुरु आहे. आवेश सिद्धीकी आणि जाहिद हुसेन अन्सारी अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. (Thief arrested for snatching mobile phone from woman at Kalyan railway station)
कल्याण रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 1 वर एक ट्रेन उभी होती. त्याच्याशेजारीच आसनगावला जाणारी ट्रेन उभी होती. आसनगावला जाणाऱ्या ट्रेनमध्ये एक महिला मोबाईल फोनवर बोलत होती. चोरट्यांची नजर या महिलेवर गेली. दोघांपैकी एक चोरटा ट्रेनमध्ये चढला. जशी समोरची ट्रेन सुरू झाली या चोरट्यांनी एका ट्रेनच्या लगेच डब्यातून दुसऱ्या लोकलच्या खिडकीत हात टाकून त्या महिलेचा मोबाईल हिसकावून पळ काढला. रेल्वे स्थानकातील सीसीटीव्हीत हे चोरटे कैद झाले होते.
कल्याण जीआरपीच्या महिला पोलिस निरिक्षक अर्चना दुसाने आणि पोलिस निरिक्षक पंढरी कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरु केला. अखेर पोलिसांनी गुप्त माहितीदार आणि सीसीटीव्हीच्या सहाय्याने दोन्ही चोरट्यांना अटक केली. यापैकी आवेश सिद्धीकी हा घाटकोपर येथे राहणारा आहे. तर जाहिद हुसेन अन्सारी हा कळवा येथे राहणारा आहे. या दोघांच्या विरोधात यापूर्वीही गुन्हे दाखल आहे. या दोघांनी यापूर्वी किती चोऱ्या केल्या याचा तपास पोलिस करीत आहे. रस्त्यावर मोबाईल हिसकावण्याचा घटना घडत होत्या. आता धावत्या ट्रेनमध्ये चोरटे मोबाईल हिसकावून पळू लागल्याने रेल्वे प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. (Thief arrested for snatching mobile phone from woman at Kalyan railway station)
इतर बातम्या
Video : गोरखनाथ मंदिरात पीएसी जवानांवर हल्ला, हल्ल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
Bhandara Crime : नैराश्यातून घर सोडून गेलेल्या व्यक्तीचा वैनगंगा नदीत मृतदेह आढळला