Kalyan Crime : कल्याणमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला

कल्याण पूर्वेतल्या तिसगाव परिसरात अॅक्सिस बँकेचं एटीएम आहे. या एटीएममध्ये एक इसम काहीतरी गडबड करत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तिथे एक नेपाळी चोरटा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करताना दिसला. पोलिसांनी तात्काळ या नेपाळी चोरट्याला ताब्यात घेतलं.

Kalyan Crime : कल्याणमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न, पोलिसांच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव उधळला
कल्याणमध्ये एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 26, 2022 | 8:17 PM

कल्याण : कल्याणमध्ये एटीएम (ATM) मशीन फोडून पैसे चोरण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका नेपाळी चोरट्याला कोळसेवाडी पोलिसांनी बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. पोलिसांच्या सतर्कतेमुळे या चोरट्याचा चोरीचा डाव फसला आहे. हरकबहाद्दूर बुढ्ढा असं या चोरट्याचं नाव आहे. बु्ढ्ढा हा मूळचा नेपाळचा असून काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये आला होता. अन् चोरी करण्याच्या प्रयत्नामुळे कल्याण पोलिसांच्या तावडीत सापडला. पोलिसांनी बुढ्ढाला अटक करत त्याची चौकशी सुरु केली आहे. बुढ्ढाने याआधी असा गुन्हा केला आहे का ? त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे का ? याबाबत पोलिस चौकशी करत आहेत. (Thief arrested for trying to rob ATM machine in Kalyan)

तिसगाव परिसरात अॅक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न

कल्याण पूर्वेतल्या तिसगाव परिसरात अॅक्सिस बँकेचं एटीएम आहे. या एटीएममध्ये एक इसम काहीतरी गडबड करत असल्याची माहिती कोळसेवाडी पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता तिथे एक नेपाळी चोरटा एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न करताना दिसला. पोलिसांनी तात्काळ या नेपाळी चोरट्याला ताब्यात घेतलं. तो काही दिवसांपूर्वीच कल्याणमध्ये आला असून त्याने पैसे चोरण्यापूर्वीच त्याला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

सांगलीतही अॅक्सिस बँकेचे एटीएम लुटण्याचा प्रयत्न

सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आरग येथे चक्क जेसीबीच्या सहाय्याने ॲक्सिस बँकेचे एटीएम फोडण्याचा अजब प्रकार उघडकीस आला. ही घटना शनिवारी मध्य रात्री सव्वा बारा वाजेच्या सुमारास घडली. सदर एटीएममध्ये 27 लाखांची रोख रक्कम रोकड होती. मात्र पैसे सुरक्षित आहेत. ही बातमी वाऱ्यासारखी गावात पसरली. मध्य रात्रीच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. या चोरीचे सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांच्या हाती लागले आहे. त्यावरुन पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत. (Thief arrested for trying to rob ATM machine in Kalyan)

इतर बातम्या

Pune dowry case : पुण्यात पुन्हा हुंडाबळी! 24 वर्षीय तरुणीची 11 व्या मजल्यावरून उडी

संतापजनक… अल्पवयीन मुलीसमोर रिक्षाचालकाचं हस्तमैथून, हिंजवडी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.