Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कारखान्यातून सुटी झाल्यावर तीन कामगार घरी जात होते, कंटेनरला दुचाकी धडकली आणि…

रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा होता. हा कंटेनर रात्रीची वेळ असल्याने दुचाकी चालकाला दिसला नाही. त्याने थेट कंटेनरला धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला.

कारखान्यातून सुटी झाल्यावर तीन कामगार घरी जात होते, कंटेनरला दुचाकी धडकली आणि...
Follow us
| Updated on: Jun 11, 2023 | 3:05 PM

प्रतिनिधी, पालघर : तीन कामगार एकाच कारखान्यात काम करायचे. काम आटोपून काल रात्री ते घरी परत येत होते. पण, रस्त्याच्या बाजूला कंटेनर उभा होता. हा कंटेनर रात्रीची वेळ असल्याने दुचाकी चालकाला दिसला नाही. त्याने थेट कंटेनरला धडक दिली. यामुळे भीषण अपघात झाला. या अपघातात तिघांचाही जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने हा अपघात झाल्याचे सांगितले जाते. या दुर्घटनेमुळे तिन्ही कामगारांच्या कुटुंबावर दुःखाचे डोंगर पसरले आहे. तिघेही आपल्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळत होते.

दुचाकी उभ्या कंटेनरला धडकली

मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघरमधील मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दुर्घटना घडली. सातीवली येथे भरधाव बाईकने उभ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाल्याची घटना घडली. या अपघातात बाईकवरील ट्रिपल सीट असलेल्या तिघांचाही जागीच मृत्यू झाला.

हे सुद्धा वाचा

तिन्ही मृतक कारखान्यातील कामगार

मुंबईकडून गुजरातकडे जाणाऱ्या वाहिनीवर रात्रीच्या सुमारास उभ्या कंटेनरला या भरधाव बाईकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या अपघातात विक्रमगड तालुक्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला. हे तिन्ही मृतक वसईतील एका कारखान्यातील कामगार असल्याची माहिती समोर आली.

या तिघांचा झाला मृत्यू

कारखान्यातून सुट्टी झाल्यावर घरी परतत असताना हा भीषण अपघात झाला. या अपघातात नरेश लाडक्या भोईर (वय 22 रा. करसोड), सूरज राघ्या ठाकरे (वय 18 रा. डोल्हारी बुद्रुक), मयूर विनोद ठाकरे (रा .17 डोल्हारी बुद्रुक) या तिघांचा मृत्यू झाला.

तिघेही कामगार एका गाडीने परत येत होते. यावेळी हा अपघात झाला. चालकाच्या नजरेत समोरील कंटेनर दिसला नाही. त्यामुळे भीषण अपघात झाला. अपघातानंतर तिघांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. तीन कामगार कुटुंब उघड्यावर पडले आहेत.

बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे
बीड प्रकरणात पोलिसांनी मुलाहिजा बाळगू नये - अंबादास दानवे.
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने
वडाळा येथे पोलीस आणि विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आमनेसामने.
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम
रिक्षा अडवली म्हणून चालकाने पोलिसांना दिल अमित देशमुखांच्या नावाचा दम.
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी
चांडाळ चौकडी ठाकरे बंधूंना एकत्र येऊ देणार नाही; शिरसाट यांची टोलेबाजी.
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले
ठाकरे बंधूंच्या युतीवर छगन भुजबळ थेट बोलले.
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी
गिरगावात ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मनसेची बॅनरबाजी.
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू
जम्मू-काश्मीरमध्ये मुसळधार पाऊस आणि भूस्खलन; तिघांचा मृत्यू.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गगनचुंबी पुतळ्याचं काम पूर्णत्वाकडे.
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला
शिंदेंना ठाकरे बंधु एकत्र यायला नको आहे; राऊतांचा टोला.
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन
ठाकरे बंधूंच्या युतीच्या चर्चेवर शरद पवारांचे मौन.