Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dombivli Building Collapse | डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, काही नागरीक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

डोंबिवलीत काल रात्री आणि आज सकाळी देखील पाऊस पडला. या दरम्यान एक जीर्ण झालेली इमारत कोसळली आहे. ही इमारत तीन मजली होती. या इमारतीत अनेक कुटुंब वास्तव्यास होते. ही इमारत आज अचानक जमीनदोस्त झालीय.

Dombivli Building Collapse | डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली, काही नागरीक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती
Follow us
| Updated on: Sep 15, 2023 | 6:33 PM

डोंबिवली | 15 सप्टेंबर 2023 : डोंबिवलीतून एक मोठी बातमी समोर आलीय. डोंबिवलीत तीन मजली इमारत कोसळली आहे. डोंबवली पूर्वेतील आयरे-दत्तनगर परिसरातील आदिनारायण नावाची इमारत कोसळली आहे. आदिनारायण सोसायटीची ही इमारत जुनी झाली होती. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने या इमारतीमधील रहिवाशांना कालच दुसरीकडे स्थलांतरीत होण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर आज इमारत कोसळल्याची घटना घडलीय.

केडीएमसीच्या नोटीसनंतर काही कुटुंबानी सुरक्षितस्थळी जाण्याचा निर्णय घेतला. तर अनेक कुटुंब अजूनही या इमारतीत वास्तव्यास होते. याशिवाय कल्याण डोंबिवलीत काल रात्री आणि आज सकाळीदेखील पाऊस सुरु होता. या दरम्यान ही इमारत कोसळली आहे. या घटनेत अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती वर्तवण्यात येत आहे.

संबंधित घटनेची माहिती मिळताच तातडीने अग्निशामक दलाचे जवान, महापालिका प्रशासन, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. प्रशासनाकडून बचावाचं कार्य युद्ध पातळीवर सुरु झालं. बचाव पथकाकडून ढिगारा बाजूला करण्याचं काम सुरु आहे. नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाकडून रेस्क्यू ऑपरेशन सुरु आहे.

‘प्रशासनाने नागरिकांना बाहेर काढलं, पण…’

कल्याण डोंबिवली महापालेकिचे आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी या घटनेवर माहिती दिली. “ही इमारत खचत आहे, असं समजल्यानंतर आमचे सहाय्यक आयुक्त आणि इतर सहकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी इमारतीत वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना बाहेर काढलं. पण तरीही दोन जण अडकल्याची माहिती समोर आलीय”, असं केडीएमसी आयुक्तांनी सांगितलं.

“एक 70 वर्षाच्या वयोवृद्ध आहेत. तर दुसऱ्या 45 वर्षीय महिला आहेत. त्यादेखील आजारी आहेत. त्यामुळे त्यांना बाहेर काढता आलं नाही. बचाव कार्य सुरु करण्यात आलंय. या दुर्घटनेत ते जखमी झाले असतील तर तातडीने त्यांच्यावर उपचार करण्यात येतील”, असं केडीएमसी आयुक्तांनी सांगितलंय.

“ही इमारत धोकादायक होती. या इमारतमध्ये वास्तव्यास असणाऱ्या नागरिकांना याआधी नोटीस देण्यात आली होती. लोकांना बाहेरही काढण्यात आलं होतं. पण ते पुन्हा तिथे वास्तव्यास गेले. त्यानंतर आज ही दुर्घटना घडलीय. आजूबाजूच्या इमारतीदेखील खाली करण्यात आल्या आहेत. त्या इमारतीदेखील निष्कलीत अर्थात पाडून टाकण्यात येतील”, अशी प्रतिक्रिया केडीएमसी आयुक्त भाऊसाहेब दांगडे यांनी दिली.

...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन
...हेच दहशतवादाला उत्तर, संदीप देशपांडेंचं काश्मीरला जाण्याचं आवाहन.
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव
माझ्यासमोर बाबाला.,डोंबिवलीच्या मोनेंच्या मुलीचा मन सुन्न करणारा अनुभव.
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट
बैसरन खोऱ्यात शुकशुकाट; टीव्ही9 मराठीचा ग्राऊंड रिपोर्ट.
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर
भारत जंगी दुश्मन.., पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाईंड कसुरीचा व्हिडीओ समोर.
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव
आसावरी जगदाळेंनी शरद पवारांना सांगितला थरारक अनुभव.
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव
..पण तोपर्यंत उशीर झाला होता, गनबोटेंच्या पत्नीनं सांगितला थरारक अनुभव.
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक
पहलगाम घटनेच्या निषेधार्थ मालेगाव बंदची हाक.
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या
लष्कर-ए-तोयबासाठी काम करणाऱ्या 4 दहशतवाद्यांच्या मुसक्या आवळल्या.
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट
हल्ला झालेल्या बैसरन खोऱ्यातून टीव्ही9 चा ग्राउंड रिपोर्ट.
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया
आमच्या भावना, संवेदना सरकार सोबत; पहलगामवर संजय राऊतांची प्रतिक्रिया.