Titwala-Murbad Railway : टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाबाबत दिलासादायक बातमी! राज्य सरकार 50% खर्च उचलणार, फडणवीसांची हमी

Titwala-Murbar Railway Project :टिटवाळा-मुरबाड रेल्वे मार्गाची प्रतिक्षा गेल्या अनेक वर्षांपासून आहे.

Titwala-Murbad Railway : टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाबाबत दिलासादायक बातमी! राज्य सरकार 50% खर्च उचलणार, फडणवीसांची हमी
रेल्वेरुळImage Credit source: TV9 Marathi
Follow us
| Updated on: Jul 12, 2022 | 11:37 AM

मुंबई : टिटवाळा मुरबाड रेल्वे (Titwala-Murbad Railway) आता लवकरच प्रत्यक्षात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे गेल्या अडीच वर्षांपासून रडखलेला प्रस्ताव आता पुन्हा मार्गी लागण्याची शक्यताय. गेल्या अनेक वर्षांपासून टिटवाळा-मुरबाड रेल्वे मार्ग प्रलंबित आहे. आता या मार्गाबाबत राज्यातील नव्या सरकारने महत्त्वाचा निर्णय गेतला आहे. बहुप्रतिक्षित टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गाच्या प्रकल्पासाठी राज्य सरकारकडून निम्मा खर्च केला जाईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. टिटवाळा-मुरबाड रेल्वेसाठी 50 टक्के खर्च राज्यातील शिंदे-फडणवीस (Ekanth Shinde-Devendra Fadnavis Government) सरकारकडून उचलण्यात येणार आहे. केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी याबाबत विनंती केली होती. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारमार्फत रेल्वे मंत्रालयाकडे 50 टक्के खर्चाच्या हमीचा प्रस्ताव पाठवण्याबाबतचे निर्देशही सोमवारी दिलेत. त्यामुळे आता लवकरच टिटवाळा मुरबाड रेल्वे मार्गाच्या प्रकल्पाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जातो आहे. ठाणे जिल्ह्यात (Thane District) मुरबाड आणि कल्याण तालुक्यातील मोठा भाग आजही रेल्वे मार्गाने जोडला गेलेला नाही. त्यामुळे या भागातील अनेक गावं विकासापासून वंचित राहिली आहेत. दरम्यान, रेल्वे मार्ग जर जोडला गेला, तर टिटवाळा किंवा उल्हासनगरपासून रेल्वेमार्ग मुरबाड तालुक्यातील गावांना याचा मोठा फायदा होईल.

गेल्या अडीच वर्षांपासून प्रलंबित

टिटवाळा-मुरबाड रेल्वे मार्गाची प्रतिक्षा गेल्या अनेक वर्षांपासून आहे. या मार्गामुळे कल्याण तालुक्यातील अनेक गावेही जोडली जाणार आहे. या गावांच्या विकासाला रेल्वे प्रकल्पामुळे गती येईल. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी टिटवाळा-मुरबाड रेल्वे मार्गाला मंजुरी देण्यात आली होती. केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी यासाठी प्रयत्न केले होते.

मात्र या प्रकल्पावर पुढे ठोस काहीच घडलं नाही. या प्रकल्पाच्या कामात राज्य सरकारने निम्मा वाटा उचलावा, अशी मागणी कपिल पाटील यांनी केलेली. तशी विनंती त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली होती. कपिल पाटील यांच्या मागणीला तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली होती. मात्र, गेल्या अडीच वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. अखेर आता पु्नहा या प्रस्तावाला गती यावी, यासाठी प्रयत्न सुरु झाले आहेत.

हे सुद्धा वाचा

आता पुन्हा प्रकल्पाला गती

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सोमवारी मुंबईत भेट घेतली. या भेटीदरम्यान, टिटवाळा-मुरबाड प्रलंबित रेल्वे मार्गाच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आल. त्यावेळी राज्य सरकारकडून ५० टक्के निधी या प्रकल्पादा द्यावा, अशी विनंती कपिल पाटील यांनी केली. दरम्यान, मुरबाडवासियांना रेल्वेसेवा देण्यास भाजपा कटीबद्ध असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुरबाडमधील लोकांना दिलासा दिला आहे.

मुरबाड रेल्वेमार्गाच्या खर्चात 50 टक्के वाटा उचलण्यासंदर्भात हमी फडणवीस यांनी दिली आहे. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे प्रस्ताव तातडीने पाठविण्याच्या सूचनादेखील त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या असल्याची माहिती कपिल पाटील यांनी दिली.

बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक
बीड हत्या प्रकरणाचं पुणे कनेक्शन, तीन आरोपींपैकी दोघांना पुण्यातून अटक.
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा
'आकाचे आका तुम्हाला जेलवारी...', सुरेश धस यांचा धनंजय मुंडेंवर निशाणा.
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा
...तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही, जरांगेंचा सभेतून इशारा.
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा...
लाडक्या बहिणीचे पैसे लेकाला! चूक मान्य, पैसे केले परत, मात्र पुन्हा....
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा
'लई अवघड हाय...', मिटकरींकडून फोटो शेअर अन् बजरंग सोनावणेंवर निशाणा.
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर...
बीड हत्येतील तिन्ही फरार आरोपी दोन दिवस भिवंडीत अन् नंतर....
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?
नारायण राणेंची 45 लाखांची फसवणूक? पोलिसांकडून चौघांना अटक, प्रकरण काय?.
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?
रत्नागिरीचं पालकमंत्रीपद उदय सामंत यांना मिळणार, भाजपची सहमती?.
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं
संतोष देशमुख हत्याकाडांचा मास्टरमाईंड कोण? NCPच्या आमदारानं नावच घेतलं.
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?
दादांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न? बजरंग सोनावणेंचा मोठा दावा काय?.