प्रताप सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम, 21 कोटींचा दंड वसूल करा; सोमय्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी

भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी त्यांच्याकडून 21 कोटी रुपये वसूल करावे, अशी मागणी केली. ( Kirit Somaiya)

प्रताप सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम, 21 कोटींचा दंड वसूल करा; सोमय्यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
Kirit Somaiya - Pratap Sarnaik
Follow us
| Updated on: Sep 08, 2021 | 1:32 PM

ठाणे: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांप्रकरणी त्यांच्याकडून 21 कोटी रुपये वसूल करावे, अशी मागणी केली. (tmc should take 21 crore penalty from pratap sarnaik, says Kirit Somaiya)

किरीट सोमय्या यांनी आज ठाणे महापालिका आयुक्त विपीन शर्मा यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी मीडियाशी संवाद साधला. आम्ही पालिका आयुक्त डॉ विपीन शर्मा यांची भेट घेतली. विहंग गार्डन इमारतमधील लोकांची लवकरात लवकर सुटका करण्याची मागणी त्यांच्याकडे केली आहे. तसेच सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेने त्यांच्याकडून 21 कोटी रुपयांचा दंड वसूल करावा अशी मागणी मी आयुक्तांना केली आहे. त्याचाच पाठपुरावा करण्यासाठी मी आज आलो होतो, असं सोमय्या म्हणाले.

ठाकरे सरकार दंड वसूल का करत नाही?

सरनाईक यांच्याकडून अद्यापही हा दंड वसूल झाला नाही. ठाकरे सरकार सरनाईक यांच्याकडून 21 कोटी दंड का वसूल करत नाही? सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामांवर कारवाई कधी करणार? असा सवाल त्यांनी केला. या कारवाईबाबत राज्य सरकारशी चर्चा करून लवकरच पावलं उचलणार असल्याचं आश्वासन आयुक्तांनी दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं.

परब, सरनाईकांचे अनधिकृत बांधकाम तुटणार

मिलिंद नार्वेकर यांचा बंगला तोडला गेला. आता अनिल परब यांचे ऑफिस तुटणार आणि प्रताप सरनाईक यांच्या अनधिकृत बांधकामवर कारवाई होणार यासाठी मी ठाणे महापालिका आयुक्त यांना भेटायला आलो आहे, असं त्यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच परमबीर सिंग आणि सचिन वाझे यांना निवडले आहे, असं ते म्हणाले.

उद्या बोलणार

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल शिवसेना खासदार भावना गवळी यांची बाजू घेतली होती. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पवार हे भावना गवळींची बाजू घेत आहेत. मात्र, भावना गवळींच्या बाबत उद्या पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मी सर्व खुलासा करेल, असं त्यांनी सांगितलं.

दाऊदला बोलावलं तरी घाबरणार नाही

सोमय्या यांना केंद्र सरकारने सुरक्षा पुरवली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. सोमय्या यांची बोलती बंद करा, असं ठाकरे सरकारचं म्हणणं आहे. माझ्यावर हल्ला झाला होता. तेव्हा माझ्यासोबत केंद्रीय सुरक्षा रक्षक होते म्हणून माझा जीव वाचला. मी सुरक्षा मागितली नव्हती. केंद्राकडे आयबीचा तसा रिपोर्ट गेला म्हणून मला सुरक्षा मिळाली. हे सरकार घोटाळेबाज आहे. ठाकरे सरकार आणि शिवसेनेने कितीही गुंडांना बोलावले आणि दाऊदला देखील आणले तरी आम्ही घाबरणारे नाही, असा इशाराही त्यांनी दिला. (tmc should take 21 crore penalty from pratap sarnaik, says Kirit Somaiya)

संबंधित बातम्या:

माझ्यामुळे काही मंत्र्यांची झोप उडाली, ते भाईंची मदत घेताहेत; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप

ठाकरे सरकारविरुद्ध वात पेटवली, मोदी सरकारने सुरक्षा पुरवली, किरीट सोमय्यांभोवती 40 CISF जवानांचं सुरक्षा कवच!

शरद पवारांकडून भावना गवळींचं समर्थन, किरीट सोमय्यांचा आता पवारांना सवाल

(tmc should take 21 crore penalty from pratap sarnaik, says Kirit Somaiya)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.