Kalyan : कल्याण शहरातील आदिवासी पाडे असुविधाच्या गर्तेत, 75 वर्षानंतरही स्वच्छता गृहाची प्रतीक्षा

एकीकडे कल्याण डोंबिवली ही दोन्ही जुळी शहरे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कात टाकू पाहत आहे. तर दुसरीकडे कल्याण शहराच्या मध्यभागात गेल्या 100 वर्षाहून अधिक काळापासून राहणारे आदिवासी कातकरी बांधव मात्र मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचं विदारक चित्र समोर आलंय.

Kalyan : कल्याण शहरातील आदिवासी पाडे असुविधाच्या गर्तेत, 75 वर्षानंतरही स्वच्छता गृहाची प्रतीक्षा
कल्याण शहरातील आदिवासी पाडे असुविधाच्या गर्तेत
Follow us
| Updated on: Jan 31, 2022 | 9:29 PM

कल्याण : स्वातंत्र्याला 75 वर्षे उलटल्यानंतरही कल्याण शहरातील आदिवासी(Tribal) पाडे मात्र असुविधा (Inconvenience)च्या गर्तेतच रुतलेले असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. कल्याण बिर्ला कॉलेज नजीक असलेल्या या आदिवासी पाड्यावर राहणारे जवळपास 25 कुटुंब आजही उपेक्षिताचे जिणे जगत आहेत. शहराच्या मध्यभागी असलेल्या या पाड्यावर स्वच्छतागृहाची कोणतीही सुविधा नसल्याने या नागरिकांना विशेषतः महिला वर्गाला अंधाराची वाट पहावी लागते, अन्यथा 20 मिनटं पायपीट करावी लागते. सामाजिक कार्यकर्त्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून म्हाडाकडून ना हरकत दाखला घेत याठिकाणी स्वच्छतागृह मंजूर करत निविदा काढण्यात आल्यात. निविदा अंतिम टप्प्यात असून येत्या 10 ते 12 दिवसात कामाला सुरुवात होईल असे सांगितले. दरम्यान 26 जानेवारी रोजी या स्वच्छतागृहाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. मात्र हे काम अद्यापी सुरु झालेले दिसत नाही. इतकेच नव्हे तर याच दरम्यान केडीएमसीकडून या पाड्यावर ठेवण्यात आलेल्या फिरत्या शौचालयाची देखील दुरावस्था झालीय आहे. एकीकडे कल्याण डोंबिवली ही दोन्ही जुळी शहरे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कात टाकू पाहत आहे. दुसरीकडे या पाड्याची दुरवस्था पाहता कल्याण शहराची शोकांतिका उघड झाली आहे. (Tribal area in Kalyan city waiting for basic facilities)

आदिवासी अद्यापही सुविधेच्या प्रतीक्षेत

एकीकडे कल्याण डोंबिवली ही दोन्ही जुळी शहरे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून कात टाकू पाहत आहे. तर दुसरीकडे कल्याण शहराच्या मध्यभागात गेल्या 100 वर्षाहून अधिक काळापासून राहणारे आदिवासी कातकरी बांधव मात्र मूलभूत हक्कांपासून वंचित असल्याचं विदारक चित्र समोर आलंय. कल्याण बिर्ला कॉलेजपासून काही अंतरावर रोड लगतच आदिवासी कातकरी बांधवांची वस्ती आहे. 25 कुटुंब मिळून 100 ते 125 लोक या वस्तीत दोन तीन पिढ्यापासून वास्तव्यास आहेत. मात्र स्वातंत्र्याला 75 वर्ष लोटूनही या वस्तीमधील घरे आजतागायत पक्की नाहीत. पत्रे प्लास्टिकच्या आवरणाने झाकलेल्या घरात हे बांधव राहतात. या ठिकाणी गटारांची सुविधा ना शौचालयाची. म्हणायला या पूर्ण वस्तीला मिळून एक नळ कनेक्शन दिलं आहे. या वस्तीतील नागरिकांची विशेषत महिला वर्गाची शौचालयाअभावी कुचंबना होतेय. या महिलांना एक तर अंधार होण्याची वाट पहावी लागते किंवा 20 मिनटं पायपीट करावी लागते.

दिल्ली अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार

सदर बाब सामाजिक कार्यकर्ते व भाजपचे आदिवासी मोर्चा प्रकोष्ठ राहुल देठे यांच्या निदर्शनास आली. त्यांनी या पाड्यावर शौचालयाची मागणी करत याबाबत केडीएमसीकडे पाठपुरावा सुरू केला. आदिवासींना त्याचा हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी दिल्ली अनुसूचित जाती जमाती आयोगाकडे तक्रार करत या आदिवासींना मुलभूत हक्क देण्याची मागणी केली होती. या तक्रारीच्या सुनावणीत आयोगाने संबधित प्रशासनाला या आदिवासीसाठी तात्काळ स्वच्छतागृहाची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले. महापालिका प्रशासनाने मागील वर्षीच्या ऑक्टोबर महिन्यात या आदिवासीसाठी फिरते शौचालय उपलब्ध करून दिले. मात्र या शौचालयाची अवस्था देखील भयाण आहे. या आदेशानंतर महापालिका प्रशासनाकडून या भागात सार्वजनिक शौचालय उभारण्याचे प्रस्ताव तयार केल्यात निविदा अंतिम टप्प्यात आहेत.

शौचालयाचे भूमीपूजन केले मात्र काम सुरु नाही

26 जानेवारी रोजी या शौचालयाच्या कामाचे भूमीपूजन करण्यात आले आहे. या रहिवाशांना भेडसावणारी समस्या पाहता या शौचालयाचे काम भूमीपूजनानंतर वेगाने होणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र भूमिपूजनानंतर शौचालयाचे काम अद्यापी सुरूच झालेले नसल्याने या बांधवांची परवड सुरूच आहे. तर याबाबत महापालिकेच्या शहर अभियंता यांनी प्रत्यक्ष जागेवर पाहणी केली. ही जागा म्हाडाची असल्याने म्हाडाकडे जागेसाठी मंजुरी मागितली होती. मंजुरी मिळताच तात्काळ निधी उपलब्ध करत या पाड्यावर शौचलायासाठी मंजुरी घेण्यात आली आहे. निविदा अंतिम टप्प्यात आहेत. लवकरात लवकर कामास सुरुवात करण्यात येईल असं सांगितलं. (Tribal area in Kalyan city waiting for basic facilities)

इतर बातम्या

VIDEO : बदलापूरमध्ये ज्वेलर्स व्यापाऱ्याच्या डोळ्यात मिरचीपूड टाकून चोरी, संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

Kalyan Crime : शहाड रेल्वे स्थानकात चाकूच्या धाक दाखवून प्रवाशाला लुटणारे दोन चोरटे अटकेत

'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल
'दमानियांना जे करायचं ते करू द्या...', गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल.
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी
कल्याण अत्याचार प्रकरण, आरोपी विशाल गवळीच्या वकिलाला धमकी.
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?
बीडच्या फरार आरोपींचं प्रसिद्ध पत्रक जारी, नेमकं काय म्हटलंय?.
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले
राऊतांना मातोश्रीवर धुतलं, खोलीत डांबलं? बातम्या व्हायरल; राऊत भडकले.
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता...
लाडकी बहीण योजनेबाबत मोठी अपडेट, 'या' पाच प्रकारच्या बहिणींना आता....
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?
'मेजर ध्यानचंद खेलरत्न'ची घोषणा, मनु भाकर-डी गुकेशसह कोणाचा सन्मान?.
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'
'आमच्याकडे आता गर्दी, आमच्यासोबत या असं आम्ही साळवींना म्हटलो नाही'.
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट
'दादांच्या ताफ्यात वाल्मिक कराडची गाडी..' बीडच्या खासदाराचा गौप्यस्फोट.
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना
अंत्यविधीची तयारी सुरू अन् 'तो' जिवंत झाला; सिनेमात शोभेल अशी घटना.
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले...
ठाकरे गटाचे राजन साळवी भाजपच्या वाटेवर? होणाऱ्या चर्चांवर म्हणाले....