Thane Crime : ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक, चार गुन्हे उघड

घटनास्थळी कोणतेही पुरावे नसताना पोलिसांनी या आरोपींना शोधून बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून 2 लाख रुपयाचा मुद्देमाल आणि एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे.

Thane Crime : ठाण्यात सोनसाखळी चोरीच्या गंभीर गुन्ह्यातील 2 आरोपींना अटक, चार गुन्हे उघड
कुख्यात गुंड आणि मोक्काच्या आरोपींच्या संपत्तीवर नागपूर पोलिसांची कारवाई
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 11:52 PM

ठाणे : ठाण्यातील कळवा परिसरात सोनसाखळी (Chain Snatching) चोरणाऱ्या 2 तरुणांना कळवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. गेले काही दिवस कळवा परिसरात सोनसाखळी चोरीचे प्रमाण वाढत आहे. कळवा पोलिस ठाण्या (Kalwa Police)त नोंदवण्यात आलेल्या तक्रारीवरून पोलिस स्टेशन हद्दीत पोलिसांनी गस्त वाढवून दोन आरोपीं (Two Accused)ना कळवा पूर्व मफतलाल परिसर येथून ताब्यात घेऊन या गुन्ह्याची उकल करण्यात आली आहे. घटनास्थळी कोणतेही पुरावे नसताना पोलिसांनी या आरोपींना शोधून बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपींकडून 2 लाख रुपयाचा मुद्देमाल आणि एक दुचाकी ताब्यात घेण्यात आली आहे. (Two accused arrested in Thane for stealing gold chain)

या आरोपींना ठाणे न्यायालयाने 9 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय देखील कळवा पोलिसांनी व्यक्त केला आहे. महिलांनी घराबाहेर पडताना महागडे दागिने घालू नये व रस्त्यावर चालताना आपल्या दागिन्यांची काळजी घेण्याचे आवाहन यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त व्यंकट आंधळे यांनी केले आहे.

उल्हासनगरात दुचाकीचोरी सीसीटीव्हीत कैद

उल्हासनगरात दुचाकी चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. कॅम्प 3 मधील गणेश नगर भागात ही चोरीची घटना घडली आहे. गणेश नगर भागात राहणाऱ्या योगेश करोतिया यांनी त्यांची मोटारसायकल रात्री 10 च्या सुमारास खत्री भवन समोर लावली होती. रात्री दोन वाजेच्या सुमारास ही मोटारसायकल दोन चोरट्यांनी चोरून नेली. चोरीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सकाळी दुचाकी जागेवर नसल्यानं करोतिया यांनी सीसीटीव्ही चेक केलं असता दुचाकी चोरी झाल्याचं स्पष्ट झालं. यानंतर करोतिया यांनी याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार केली असून पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल करत चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

अंबरनाथमध्ये चोरट्यांनी तीन दुकानं फोडली

अंबरनाथमध्ये चोरट्यांनी एकाच रात्रीत तीन दुकानं फोडल्याची घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे अंबरनाथच्या स्वामी समर्थ चौक या अतिशय गजबजलेल्या भागात ही चोरी झाली आहे. स्वामी समर्थ चौकातील स्वामी दर्शन अपार्टमेंटमध्ये राज ऍक्वेरियम अँड पेट शॉप नावाचं दुकान आहे. शनिवारी 5 मार्चच्या रात्री या दुकानाचं शटर उचकटून चोरट्यांनी रोख रक्कम आणि दुकानात लावलेले वायफायचे सीसीटीव्ही कॅमेरे चोरून नेले. तर याच दुकानांच्या बाजूला असलेली दोन दुकानं सुद्धा फोडण्यात आली. दोन चोरट्यांनी केलेली ही चोरीची घटना याच ठिकाणी असलेल्या एका सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. (Two accused arrested in Thane for stealing gold chain)

इतर बातम्या

Amaravati Crime : हरवलेले आणि चोरी गेलेले 22 लाख किंमतीचे 150 मोबाईल अमरावती शहर पोलिसांनी केले परत

…अन्यथा 16 मार्चनंतर ओला, उबर चालवता येणार नाही? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.