कल्याणमध्ये पुन्हा खळबळजनक घटना! भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद

कल्याणमध्ये भाजप कार्यकर्त्यावर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे कल्याणमध्ये गुन्हेगारीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. असं असताना आता भाजपच्या कार्यकर्त्यावरच हल्ला झाल्याने पोलीस या प्रकरणात काय तपास करतात? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

कल्याणमध्ये पुन्हा खळबळजनक घटना! भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला, घटना सीसीटीव्हीत कैद
कल्याणमध्ये भाजपच्या ज्येष्ठ कार्यकर्त्यावर जीवघेणा हल्ला
Follow us
| Updated on: Dec 22, 2024 | 5:49 PM

कल्याण शहरात गुन्हेगारीच्या घटनांनी अक्षरश: हैदोस माजवलेला बघायला मिळत आहे. कल्याणमध्ये सातत्याने अतिशय धक्कादायक आणि संतापजनक गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. नुकतंच कल्याणमध्ये मराठी कुटुंबाला मारहाण करतानाची घटना समोर आली होती. त्यानंतर कल्याण पूर्वेत काटेमानिवली नाका परिसरात टोळक्याने एका कुटुंबावर हल्ला केल्याची बातमी समोर आली. यानंतर एका चार वर्षीय चिमुकलीसोबत अश्लील कृत्य केले म्हणून जाब विचारायला गेलेल्या पोलीस कुटुंबावर परप्रांतीयांनी हल्ला केल्याची संतापजनक घटना घडली. यानंतर आता मारहाणीची आणखी एक संतापजनक घटना घडली आहे. विशेष म्हणजे सत्ताधारी भाजप पक्षाच्याच ज्येष्ठ कार्यकर्त्यावर हा जीवघेणा हल्ला झाला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. हल्ला करणारे किती भयानकपणे मारहाण करत होते ते तंतोतंत सीसीटीव्हीत कैद झालं आहे.

नेमकं काय घडलं?

कल्याण पश्चिमेतील आणखी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत परांजपे यांच्यावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. संबधित घटना ही काल रात्री 10 वाजेच्या सुमारास घडली आहे. हेमंत परांजपे पारनाका परिसरातून जात असताना एका मोटरसायकलवर आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर लाथा बुक्क्यांसह रस्त्यावर असलेले मोठ्या दगडांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आरोपी हेमंत परांजपे यांच्यावर मोठमोठे दगड टाकून त्यांना ठेचण्याचा प्रयत्न करत आहेत की काय? असा प्रश्न मनात निर्माण होईल, इतक्या भयानक पद्धतीने मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सुन्न करणारे आहेत. आता या प्रकरणातील मारहाण करणाऱ्या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश येतं का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा

या हल्ल्यात हेमंत परांजपे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर कल्याण पश्चिमेतील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हेमंत परांजपे यांच्यावर नेमका कोणी आणि का हल्ला केला? या प्रश्नाचं उत्तर अद्याप समजू शकलेलं नाही. पण या घटनेमुळे हेमंत परांजपे यांच्या समर्थकांकडून संताप व्यक्त केला जातोय. या प्रकरणी आता पोलिसांकडून काय कारवाई केली जाते ते पाहणंदेखील महत्त्वाचं आहे.

'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच
एकनाथ शिंदेंना ठाण्याचं पालकमंत्रीपद मिळणार की...? महायुतीत रस्सीखेच.
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली
दाटले रेशमी धुके.. मुंबई-गोवा महामार्गावर धुक्याची चादर वाहतूक मंदावली.