फार्म हाऊसमधील दरवाजा उघडायला गेले, दोन चुलतभावांसोबत घडली भयंकर घटना
पावसामुळे काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशीच एक दुर्घटना ढवळे फार्महाऊसवर घडली.
प्रतिनिधी, ठाणे : पावसाळा सुरू झाला. गेल्या दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले. काही लोकं फार्म हाऊसवर काम करतात. काही जण स्वतः फार्महाऊस चालवतात. त्यावेळी तिथं पावसामुळे काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. अशीच एक दुर्घटना ढवळे फार्महाऊसवर घडली. जयेश बैकर हा फॉर्म हाऊसमधील कोंबड्यांच्या खुराड्याचा दरवाजा उघडण्यासासाठी गेला. मात्र त्या दरवाजात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला विजेचा जोरदार धक्का लागला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या कुमारलाही विजेचा धक्का लागून दोघांचा जागीच मृत्यू झाला.
तिसरा बचावला
या दोघांना पाहण्यासाठी आलेल्या त्यांचा तिसरा चुलत भावाचा सौम्य धक्का लागल्याने तो थोडक्यात बचावला. ढवळे गावातच फार्म हाऊसमध्ये स्विमिंग पूल होता. हा फार्म हाऊस कुमार आणि त्याच्या वडिलांनी चालवायला घेतले होते. त्याच ठिकाणी देखरेखीत काम करीत असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली आहे.
अशी आहेत दोन मृतकांची नावे
वांगणीजवळील ढवळे गावात एक फार्म हाऊसमध्ये दुर्देवी घटना घडली. विजेचा धक्का लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा मृत्यू झाला. गुरुनाथ नारायण बैकर यांचा मुलगा जयेश बैकर (वय 19 वर्षे) आणि पंडित नारायण बैकर यांचा मुलगा कुमार बैकर (वय 17 वर्षे) अशी या मुलांची नावे आहेत. जयेश बैकर आणि कुमार बैकर हे चुलत भाऊ होते.
वांगणीजवळील ढवळे गाव परिसरात राहणाऱ्या दोघा चुलत भावांचा फार्महाउसमध्ये विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. तर त्यांचा तिसरा भाऊ थोडक्यात बचावला आहे. शनिवारी सायंकाळी हा प्रकार घडला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.