आधी हत्या केली, नंतर मृतदेह दोन मजली इमारतीवरून फेकले, नेमकं काय घडलं?

हत्या झाल्यानंतर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेत रुमच्या खिडकीमधून बिल्डींगच्या खाली फेकले. रुममध्ये असलेले रक्ताचे डाग कापडाने पुसून पुरावा नष्ट केल्याचे सांगितले.

आधी हत्या केली, नंतर मृतदेह दोन मजली इमारतीवरून फेकले, नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: May 26, 2023 | 9:30 PM

सुनील जाधव, प्रतिनिधी, ठाणे : डोंबिवली मानपाडा पोलीस ठाणेचे हद्दीत साईश्रध्दा बिल्डींग इमारती एका अनोळखी इसमाचे प्रेत कचऱ्यामध्ये पडलेले सापडले. या घटनेची माहिती मानपाडा पोलिसांना मिळाली. त्यानुसार सदर बिल्डींगचे मागे जावून पोलिसांनी खात्री केली. पोलिसांना एका अनोळखी इसमाचे प्रेत आढळले. त्याच्या नाकातोंडास, हातास आणि पायावर जखमा होत्या. पोलिसांना त्या व्यक्तीची हत्या झाल्याचा संशय आला.

पोलिसांची तीन पथके

कल्याण झोन तीनचे पोलीस उपआयुक्त, सचिन गुंजाळ, डोंबिवली सहाय्यक पोलीस आयुक्त, सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली मानपाडा पोलिसांनी पथक तयार केली. मानपाडा ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे यांनी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे अधिकारी आणि अंमलदार यांची तीन पथके तयार करण्यात आले.

thane 1 n

हे सुद्धा वाचा

हे दोन जण पार्टी करण्यासाठी सोबत असायचे

गुप्त बातमीदारामार्फत मयत इसमाचे नाव राजेश रामवृक्ष आहे. तो बिगारीचे काम करीत त्या ठिकाणी राहत असे. कधी कधी त्याच्यासोबत त्याचे मित्र दादू मह जाधव उर्फ पाटील आणि विनोद पडवळ पार्टी करण्यासाठी त्याच्यासोबत असायचे. अशी माहिती पोलिसांना मिळाली.

दोघांनी दिली हत्येची कबुली

पोलिसांनी सापळा रचून हत्यानंतर पळ काढणाऱ्या दादु मह जाधव उर्फ पाटील आणि विनोद पडवळ या दोघांना ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता या दोन्ही आरोपींनी खुनाची कबुली दिली. दारूच्या गुत्त्यावर चुगली करतो म्हणून लाथाबुक्यांनी आणि लाकडी दांडक्याने राजेशला मारहाण करत त्याची हत्या केली.

हत्या झाल्यानंतर त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी प्रेत रुमच्या खिडकीमधून बिल्डींगच्या खाली फेकले. रुममध्ये असलेले रक्ताचे डाग कापडाने पुसून पुरावा नष्ट केल्याचे सांगितले. सध्या मानपाडा पोलिसांनी या दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. तपास बाळासाहेब पवार, अतुल लंबे, अविनाश वनवे, सुनील तारमळे करत आहेत.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.