Kalyan Crime : कल्याण डोंबिवलीमधील “भाई” लोकांचा मुक्काम आता जेलमध्ये

आरोपींविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पूर्वेतील खडगोलवली परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आशिष पांडे विरोधात कारवाई करत कोळसेवाडी पोलिसांनी त्याची रवानगी पुण्यातील येरवडा जेलमध्ये केली आहे.

Kalyan Crime : कल्याण डोंबिवलीमधील भाई लोकांचा मुक्काम आता जेलमध्ये
कल्याण डोंबिवलीमधील "भाई" लोकांचा मुक्काम आता जेलमध्ये
Follow us
| Updated on: Mar 19, 2022 | 3:47 PM

कल्याण : वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांनी ठोस पाऊले उचलण्यास सुरू केली आहे. गुन्हेगारी (Criminal) पार्श्वभूमी असलेल्या दोन गुंडाची जेल (Jail)मध्ये रवानगी करण्यात आली आहे. आणखी पाच जणांवर ही कारवाई केली जाणार असल्याची माहिती कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी दिली आहे. कल्याण डोंबिवलीत गेल्या काही दिवसांपासून मारामारी आणि इतर घटनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांचा समावेश असल्याचं समोर आलं आहे. या गुंडांना आळा घालण्यासाठी ठाणे पोलीस आयुक्त जयजित सिंग यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीविरोधात ठोस कारवाई करण्याचे आदेश दिल आहेत. या पार्श्वभूमीवर कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ यांनी गेल्या काही दिवसांपासून ही कारवाई सुरू केली आहे. गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या आरोपींची रवानगी आता थेट जेलमध्ये केली जात आहे. (Two goons from Kalyan Dombivali were sent to jail)

आरोपींविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई

आरोपींविरोधात एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण पूर्वेतील खडगोलवली परिसरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आशिष पांडे विरोधात कारवाई करत कोळसेवाडी पोलिसांनी त्याची रवानगी पुण्यातील येरवडा जेलमध्ये केली आहे. मानपाडा पोलिसांनी देशमुख होम परिसरात राहणाऱ्या गुंड त्रिशांत साळवी याची रवानगी देखील जेलमध्ये केली आहे. एक वर्षासाठी या दोघांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. हे आरोपी एक वर्ष जेलमध्ये राहणार आहेत. आणखी पाच जणांवर एमपीडीए अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.

दोन वर्षात एसडीओंनी केले 40 गुन्हेगार जिल्ह्यातून ‘तडीपार’

शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीने डोके वर काढले होते. मात्र अशावेळी पोलिस सराईत गुन्हेगारांवर आळा घालण्यासाठी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे गुन्हेगारांची कुंडली पाठवतात. मग या गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार केले जाते. मागील दोन वर्षात अशा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळत उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे यांच्या आदेशान्वये तब्बल 40 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले. कायदा व सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गुन्हेगाराच्या हद्दपारीचा प्रस्ताव पोलीस ठाण्यातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविला जातो. 2021 मध्ये 16, 2020 मध्ये 15 तसेच देवळी पुलगाव येथील 9 गुन्हेगारांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार केले. (Two goons from Kalyan Dombivali were sent to jail)

इतर बातम्या

Bus Accident | 60 प्रवाशांसह खचाखच भरलेली बस उलटली, आठ जणांचा जागीच मृत्यू

Video – The Burning Truck | वाशिमकडे जाणाऱ्या ट्रकला भीषण आग, चालकाचा वाचला जीव

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.