Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Badlapur Crime : बदलापुरात गॅस कटरने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न, सलून चालकाच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला

बदलापूर पश्चिमेच्या बेलवली परिसरातील जाधव कॉलनी भागात कॅनरा बँकेचं एटीएम आहे. या एटीएममध्ये उस्मान शेख हा सलून चालक काल रात्री दीड वाजम्याच्या सुमारास पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला एक तरुण एटीएमच्या बाहेर उभा असलेला, तर एक तरुण एटीएमच्या आतमध्ये मशीन तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं.

Badlapur Crime : बदलापुरात गॅस कटरने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्न, सलून चालकाच्या सतर्कतेमुळे चोरीचा डाव फसला
बदलापुरात गॅस कटरने एटीएम मशीन कापण्याचा प्रयत्नImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 30, 2022 | 5:36 PM

बदलापूर : बदलापुरात गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम (ATM) मशीन कापून चोरीचा प्रयत्न करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांचा हा डाव एका सलून चालकाच्या सतर्कतेमुळे उधळला गेला असून पोलिसांनी याप्रकरणी दोन चोरट्यांना बेड्या (Arrest) ठोकल्या आहेत. संदीप भगवान शिंदे (20) आणि वेदांत विलास चिरमुले (18) अशी या दोघांची नावं आहेत. हे दोघेही भांडुपला राहणारे असून शुक्रवारी संध्याकाळी 6 वाजता ते चोरी करण्याच्या उद्देशाने बदलापूरला आले होते. यानंतर त्यांनी रेकी करून बेलवलीतल्या या कॅनरा बँकेच्या एटीएमची निवड केली आणि मध्यरात्री तिथे दरोडा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र सलून चालक उस्मान शेख याच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा डाव उधळला गेल्याची माहिती बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता गावडे यांनी दिली. (Two persons were arrested for trying to cut an ATM machine with a gas cutter in Badlapur)

सलून चालक पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला असता घटना उघड

बदलापूर पश्चिमेच्या बेलवली परिसरातील जाधव कॉलनी भागात कॅनरा बँकेचं एटीएम आहे. या एटीएममध्ये उस्मान शेख हा सलून चालक काल रात्री दीड वाजण्याच्या सुमारास पैसे काढण्यासाठी गेला होता. यावेळी त्याला एक तरुण एटीएमच्या बाहेर उभा असलेला, तर एक तरुण एटीएमच्या आतमध्ये मशीन तोडण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसलं. त्यामुळं त्यानं या दोघांना हटकलं असता ते दोघेही तिथून पळून जाऊ लागले. त्यामुळं उस्मान याने त्यांचा पाठलाग करत ‘चोर.. चोर..’ असं ओरडण्यास सुरुवात केली. त्याचवेळी तिथून जात असलेल्या बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या 2 बीट मार्शल्सना हा प्रकार दिसला. त्यांनी पाठलाग करत या दोघांना पकडलं असता त्यांच्याकडे गॅस कटरसह दरोडा टाकण्यासाठी वापरलं जाणारं साहित्य आढळून आलं. त्यामुळं त्यांना ताब्यात घेत त्यांची चौकशी केली असता, त्यांनी आपण एटीएम कापून पैसे चोरी करत असल्याची कबुली पोलिसांना दिली.

कर्जबारीपणामुळे चोरीचा मार्ग स्वीकारला

दरम्यान, या दोघांपैकी आरोपी संदीप शिंदे याने भांडुपमध्ये मोबाईलचं दुकान टाकलं होतं. मात्र हे दुकान न चालल्यानं तो कर्जबाजारी झाला होता. यातूनच आर्थिक विवंचना दूर करण्यासाठी झटपट पैसे मिळवण्याच्या हेतूने त्यांनी हा मार्ग निवडल्याचं पोलिसांनी सांगितलं. या दोघांनाही न्यायालयात हजर करण्यात आलं असता पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्यांनी यापूर्वी असे काही प्रकार केले आहेत का? याचा तपास पोलिस करत आहेत. (Two persons were arrested for trying to cut an ATM machine with a gas cutter in Badlapur)

हे सुद्धा वाचा

राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण..
राज ठाकरेंच्या 'हिंदी' विरोधानंतर शेलार आक्रमक; म्हणाले, अभ्यासपूर्ण...
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा
रोहित पवारांकडून दादांचं जंगी स्वागत, जामखेडच्या 'त्या' बॅनरची चर्चा.
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?
'तुम्हाला चड्ड्याही नव्हत्या तेव्हापासून मी...', पडळकरांचा रोख कोणावर?.
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?
काँग्रेसला पुण्यात झटका? संग्राम थोपटे भाजपात? रविवारी देणार राजीनामा?.
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?
'मुंडेंची चांगली वाणी बंद पडलीय अन्...', नामदेव शास्त्री काय म्हणाले?.
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
हिंदी ही संपर्कसूत्राची भाषा आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन
मुंडेंसाठी सगळ्यांनी प्रार्थना करा, नामदेव शास्त्रींनी केलं आवाहन.
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा
..म्हणून अट्टाहास, हिंदीची सक्ती महाराष्ट्रातच का? राज ठाकरेंचा इशारा.
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल
भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांचा पुण्याच्या मशिदीतला व्हिडीओ व्हायरल.
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले
नव्या वक्फ कायद्याला तूर्त स्थगिती, कोर्टाच्या निर्णयावर ओवैसी म्हणाले.