Corona: अंबरनाथमध्ये परदेशातून आलेले दोघे पॉझिटिव्ह, दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी पालिका सज्ज

अंबरनाथ शहरात पालिकेच्या डेन्टल कॉलेज कोव्हिड सेंटरमध्ये सध्या एक विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात 30 रुग्णांना दाखल करण्याची क्षमता आहे. तर संपूर्ण रुग्णालयात आयसीयू बेड्ससह तब्बल 700 रुग्णांना दाखल करण्याची क्षमता आहे.

Corona: अंबरनाथमध्ये परदेशातून आलेले दोघे पॉझिटिव्ह, दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत वाढ, तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी पालिका सज्ज
कोरोना विषाणू
Follow us
| Updated on: Dec 31, 2021 | 6:32 PM

अंबरनाथ : अंबरनाथ शहरात परदेशातून आलेले दोन जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. या दोघांना सध्या अंबरनाथ पालिकेच्या डेन्टल कॉलेज कोव्हीड सेंटरमध्ये दाखल करण्यात आलंय. तर दुसरीकडे शहरातील रुग्णसंख्याही दिवसागणिक वाढत चालली असून यामुळे तिसऱ्या लाटेची चिंता वाढली आहे. अंबरनाथ शहरात आतापर्यंत दिवसाला 4 ते 5 कोरोना रुग्ण आढळत होते. मात्र गेल्या दोन दिवसात रुग्णसंख्येनं दोन अंकी आकडा गाठला आहे.

आज अंबरनाथ शहरात 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

आज अंबरनाथ शहरात तब्बल 18 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. चिंतेची बाब म्हणजे यातले दोघे हे आंतरराष्ट्रीय प्रवास करून आले आहेत. या दोघांनाही सध्या अंबरनाथ नगरपालिकेच्या जांभूळ इथल्या डेन्टल कॉलेज कोव्हिड सेंटरमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय. या दोघांना सौम्य लक्षणं असून त्यांचे नमुने जीनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवण्यात आल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेचे अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण यांनी दिली आहे.

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यात पालिका सज्ज

अंबरनाथ शहरात पालिकेच्या डेन्टल कॉलेज कोव्हिड सेंटरमध्ये सध्या एक विभाग सुरू करण्यात आला आहे. या विभागात 30 रुग्णांना दाखल करण्याची क्षमता आहे. तर संपूर्ण रुग्णालयात आयसीयू बेड्ससह तब्बल 700 रुग्णांना दाखल करण्याची क्षमता आहे. मात्र कोरोना काहीसा कमी झाल्यामुळे हे हॉस्पिटल बंद करून ठेवण्यात आलं होतं. आता पुन्हा एकदा हे हॉस्पिटल सुरू करण्यात आलं असून ऑक्सिजन स्टोरेज फुल करून ठेवण्यात आला आहे. याच हॉस्पिटलबाहेर हवेतून ऑक्सिजन निर्मिती करणारी सुद्धा मशीन बसवण्यात आली आहे. रुग्णसंख्या वाढल्यास आयसीयू, व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन बेड अशा पूर्ण क्षमतेसह दोन दिवसात हे हॉस्पिटल सुरू करण्याची तयारी अंबरनाथ नगरपालिकेनं ठेवली आहे. यासाठी डॉक्टर्स आणि नर्सिंग स्टाफ यांचीही भरती अंबरनाथ नगरपालिकेने सुरू केली आहे. मात्र कोरोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी नागरिकांनीही काळजी घेण्याचं आवाहन अंबरनाथ नगरपालिकेने केलं आहे. (Two positives from abroad in Ambernath, Increase in corona patients in two days)

इतर बातम्या

Kalyan Crime: पती-पत्नीने मित्रांच्या मदतीने रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुटले, सीसीटीव्हीच्या सहाय्याने लागला गुन्ह्याचा छडा

Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.