ठाण्यात पाण्याची टाकी साफ करताना दोन कामगारांचा गुदमरून मृत्यू, दोघांची परिस्थिती गंभीर
पाण्याची टाकी साफ करत असताना चारही कामगारांना श्वास घेताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर इतर दोन कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरु केलं आणि दोन कामगारांना पोलिसांना वाचवण्यात यश आलं.
ठाणे : ठाण्यातील नौपाडा भागातील मोनालिसा इमारती शेजारी असलेल्या मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी (Water Tank) साफ करण्यासाठी टाकीत उतरलेल्या चार कर्मचाऱ्यांपैकी 2 जणांचा गुदमरून मृत्यू (Death) झाला आहे. तर 2 जणांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरु असून दोघांची प्रकृती गंभीर (Critical) आहे. पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत टाकलेल्या केमिकलचा गॅस तयार झाल्याने चौघं जण टाकीत गुदमरल्याने ही घटना घडली आहे. (Two workers suffocated to death while cleaning water tank in Thane)
टाकी साफ करण्यासाठी टाकलेल्या केमिकलमुळे त्रास
नौपाडा भागात असणाऱ्या मराठा मंडळ सांस्कृतिक केंद्राच्या इमारतीवरील पाण्याची टाकी साफ करण्यासाठी हे कामगार पाण्याच्या टाकीत उतरले होते. या ठिकाणी एकूण चार कामगार काम करत होते. त्यापैकी 2 कामगारांना पाण्याची टाकी साफ करण्यासाठी टाकीत टाकलेल्या केमिकलमुळे श्वास घेण्यास त्रास झाल्याने गुदमरून 2 कामगारांचा मृत्यू झाला आहे. विवेक कुमार आणि योगेश नरवणकर अशी मृत कामगारांची नावे आहेत तर मिथुन कुमार व गणेश नरवणकर यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या इमारतीतील पाण्याची टाकी साफ करण्याचं कंत्राट एका ठेकेदाराने घेतलं होतं. त्यासाठी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास काम सुरू करण्यात आलं होतं.
दोघांना बाहेर काढण्यास यश
पाण्याची टाकी साफ करत असताना चारही कामगारांना श्वास घेताना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. त्यानंतर इतर दोन कामगारांनी त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. ही माहिती पोलिसांना मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहचून बचावकार्य सुरु केलं आणि दोन कामगारांना पोलिसांना वाचवण्यात यश आलं. मात्र दोघांना बाहेर काढण्यात मोठी अडचण निर्माण होत असल्याने तात्काळ tdrf ची टीम आणि अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. त्यानंतर दोघांना बाहेर काढत असताना दोघांचा मृत्यू झाला. तर संबंधित ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे या दोघांचा मृत्यू झाला असल्याचे नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी सांगितले. याप्रकरणी पुढील तपास नौपाडा पोलीस करीत आहेत. (Two workers suffocated to death while cleaning water tank in Thane)
इतर बातम्या
प्रेमाचा नाही नेम, 20 दिवसांत तब्बल 8 जणांचा झाला गेम! Rajasthan मधील 8 हत्याकांडाची Murder Mystery
Noida Crime : नोएडामध्ये मूल चोरल्याच्या संशयावरून तरुणाची हत्या, मुख्य आरोपीला अटक