Kalyan news : नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते तरुण, मात्र पोहण्याचा मोह आवरला नाही अन्…

दोघे मित्र नदीवर कपडे धुवायला गेले होते. एका मित्राला नदीत पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याने नदीत उडी घेतली. पण त्याच हा मोह दोघांनाही महागात पडला.

Kalyan news : नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते तरुण, मात्र पोहण्याचा मोह आवरला नाही अन्...
कल्याणमध्ये उल्हा नदीत दोन तरुण बुडालेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 11, 2023 | 5:13 PM

कल्याण / 11 ऑगस्ट 2023 : कपडे धुण्यासाठी उल्हास नदीवर गेलेले दोन तरुण नदीत वाहून गेल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. सलमान फुरकान अन्सारी आणि सरफराज अस्लम अन्सारी अशी वाहून गेलेल्या दोघा तरुणांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच कल्याण खडकपाडा पोलीस आणि अग्नीशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. अगमीशमन दलाकडून तरुणांचा शोध सुरु आहे. पावसामुळे नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढला आहे. यामुळे वाहून जाण्याच्या घटना घडत आहेत. प्रशासनाकडून वारंवार सतरर्कतेचा इशारा दिला जातो. मात्र तरीही तरुणाईला पाण्यात उतरण्याचा मोह आवरत नाही.

दोघे तरुण नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते

उल्हासनगर कँप 3 मधील शांतीनगरमध्ये राहणारे सलमान फुरकान अन्सारी आणि सरफराज अस्लम अन्सारी हे दोघे तरुण आज सकाळी 11.30 च्या सुमराास उल्हास नदीवर कपडे धुण्यासाठी गेले होते. सलमान हा मॅकेनिक काम करतो तर सरफराज हा चालक आहे. दोघेही कपडे धुवायला गेले असता सरफराज याने पोहण्यासाठी पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्यात उडी घेताच सरफराज बुडू लागला.

मित्राला बुडताना पाहून मित्र गेला अन्…

मित्राला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी सलमाननेही पाण्यात उडी घेतली. मात्र पाण्याच्या प्रवाहाच्या जोरामुळे दोघेही वाहून गेले. स्थानिकांनी कल्याण खडकपाडा पोलीस आणि अग्नीशमन दलाला माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत शोधकार्य सुरु केले. उल्हासनगर, टिटवाळा आणि कल्याण अग्निशमन दलाच्या मदतीने दोन्ही तरुणींचा शोध सुरु आहे.

हे सुद्धा वाचा

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.