डोंबिवली : गेल्या दोन दिवसात दोन 18 वर्षीय तरुणांनी आत्महत्या (Suicide) केल्याने डोंबिवलीत खळबळ माजली आहे. निखिल श्रीकांत ओहल (18) आणि करण अर्जुन शेट्टी (18) अशी आत्महत्या करणाऱ्या तरुणांची नावे आहेत. या घटनेमुळे डोंबिवली हादरली असून सांस्कृतिक शहरात चाललंय तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. निखिलने आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकले नाही. तर करणचे वडिलांसोबत भांडण (Dispute) झाल्याने रागाच्या भरात त्याने आत्महत्या केली. दोन्ही आत्महत्येची डोंबिवली लोहमार्ग पोलिसा (Dombivali Railway Police)त करण्यात आली आहे. केवळ 18 व्या वर्षी दोन्ही तरुणाने असे टोकाचे पाऊल उचलत जीवन संपवल्याने दोन्ही कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या रेल्वेकडून माहितीनुसार, निखिल श्रीकांत ओहल असे मृत्यू पावलेल्या तरुणाचे नाव आहे. डोंबिवली पूर्वेकडे असलेल्या आयरेगावातील समतानगर झोपडपट्टीत राहणाऱ्या निखिल ओहल हा तरुण राहत होता. गुरुवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास डोंबिवली ते कोपर रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या लोकल समोर येऊन आपली जीवनयात्रा संपवली. मोटरमनने रेल्वे स्टेशन प्रबंधकांना सदर घटनेची माहिती दिली. स्टेशन प्रबंधकांनी डोंबिवली लोहमार्ग पोलिसांना माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती वपोनी मुकेश ढगे यांनी दिली. मात्र निखिलने का आत्महत्या केली हे अद्याप समजू शकले नाही.
डोंबिवली पूर्वकडील म्हात्रे नगरमध्ये करण अर्जुन शेट्टी हा आपल्या कुटुंबासोबत राहत होता. करणचे बुधवारी सकाळी आपल्या वडिलांशी काही कारणाने भांडण झाले होते. याच रागातून करण घराबाहेर पडला आणि थेट रेल्वे ट्र्रॅक गाठला. कोपर ते दिवा स्थानका दरम्यान सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास त्याने लोकलसमोर उडी घेऊन आत्महत्या केली. करणच्या या टोकाच्या निर्णयामुळे शेट्टी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. दोन्ही घटनांची नोंद डोंबिवली लोहमार्ग पोलिसात करण्यात आली आहे. (Two youths commit suicide by jumping under a train in Dombivali for various reasons)