तुम्हाला राज्याचं मंत्रालय मुंबईत हवं की अहमदाबादमध्ये. राज्याचा कारभार मुंबईतून चालला पाहिजे की दिल्ली का अहमदाबाद मधून? लोकसभेची निवडणूक होती. देशाच्या लोकशाहीचा गळा घोटणारी होती. त्यांचं शेपटावर निभावलं. आपण अटोक्यात आणलं. ते मनमानी करू शकत नाही. आता हे लोक गाडले पाहिजे. आता आपली महाराष्ट्र द्वेष्ट्यांविरोधात होणार आहे. महाराष्ट्राला भिकेला लावू पाहत आहेत, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला.
आता क्लस्टर योजना आणत आहे. चांगली गोष्ट आहे. घर दिली पाहिजे. पण कंत्राटदारांना ठरवून टेंडर दिले जात आहेत. ठरावीक लोकच टेंडर भरली जात आहे. ठरलेल्या कंत्राटदारांनाच काम दिले जाते. ही ठाणे पालिकेची परिस्थिती आहे. ठाणे महापालिकेला कर्जाचे डोहाळे लागले आहेत. कुठे गेले पैसे? कुणी केले कर्जबाजारी? सर्वत्र खड्डे पाडले आहेत. तीन महिने थांबा. तुमचा मित्र परिवार उघडा पाडल्याशिवाय राहणार नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही घोटाळा केला आमचं लक्ष नाही. आमचं लक्ष राहणार आहे. महापालिकेत जे अधिकारी आहेत. त्यांना जनतेचं प्रेम आहे. ते माहिती देत असतात. जरा निवडणूक होऊन जाऊ द्या, बघा काय करतो, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
सर्वांच्या यात्रा सुरू आहेत. काल दिल्लीत गेलो. तिथं लोकं भेटली. सर्व जातीपातीचे लोक भेटतात. मुस्लिम, बौद्ध, पारसी ख्रिश्चन आले. सर्व म्हणतात कोरोना काळात तुम्ही जे काम केलं ते विसरू शकत नाही. मी एकट्याने केलं नाही. तुम्ही सर्व होते त्यामुळे महाराष्ट्र वाचला. आपण गंगेत प्रेतं वाहू दिली नाही. त्यांना वाचवलं. ही कामं लोकांना सांगा. निवडणुकीत कुणी वेडवाकडं बोललं की आपण त्यांना उत्तर देत असतो आणि कामं सांगायला जातो, असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं.
आम्हाला भीक नको. आम्हाला कष्टाचा पैसा पाहिजे असं शेतकरी म्हणतोय. आमचा हक्क मारून टाकला जात आहे. कोपराला गूळ लावला जात आहे. गुजरातला प्रकल्प जात होते. तेव्हा मिंधे म्हणाले, काळजी करू नका मोदी मोठा प्रकल्प देणार आहे. कुठे आहे प्रकल्प? दिला? असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.