Uddhav Thackeray | ‘प्रेम से बोलो, प्रेम मिळेल, पण….’, मुंब्र्यात या क्षणाला घडतय ते सर्व LIVE VIDEO

| Updated on: Nov 11, 2023 | 4:06 PM

Uddhav Thackeray | "ठाण्याचा विकास कसा झाला हे उद्धव ठाकरे यांनी पहाव. माझी त्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरे यांना अभिमान वाटेल, एकेकाळी माझ्यासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केलाय" असं नरेश म्हस्के म्हणाले.

Uddhav Thackeray | प्रेम से बोलो, प्रेम मिळेल, पण...., मुंब्र्यात या क्षणाला घडतय ते सर्व LIVE VIDEO
Uddhav thackeray Mumbra visit
Follow us on

मुंबई : मुंब्र्यातील शिवसेना शाखेची पाहणी करण्यासाठी उद्धव ठाकरे मातोश्रीवरुन निघाले आहेत. त्याचवेळी शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक मुंब्र्याच्या शाखेबाहेर एकवटले आहेत. आजच उद्धव ठाकरे यांचे मुंब्र्यातील बॅनर फाडण्यात आले आहेत. त्यावरुन दोन्ही गटांनी परस्परांना इशारे दिले आहेत. मुंब्र्यात तणाव आहे. मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात आहेत. मुंब्र्यात शिवसेना शाखेबाहेर जमलेल्या शिवसैनिकांशी आणि नरेश म्हस्के यांच्याशी संवाद साधला. “ठाण्याचा विकास कसा झाला हे उद्धव ठाकरे यांनी पहाव. माझी त्यांना विनंती आहे. उद्धव ठाकरे यांना अभिमान वाटेल, एकेकाळी माझ्यासोबत असलेल्या एकनाथ शिंदे यांनी ठाण्याचा विकास कसा केलाय” असं नरेश म्हस्के म्हणाले.

उद्धव ठाकरे यांचं स्वागत कस करणार? या प्रश्नावर नरेश म्हस्के म्हणाले की, “प्रेम से बोलो, प्रेम मिळेल. पण राग, पूर्वग्रहदूषित उद्देशाने वागलात तर आम्ही तसेच वागू. आम्ही ठाण्याचे धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे शिवसैनिक आहोत” असं नरेश म्हस्के म्हणाले. “हा रस्त्यावरचा शिवसैनिक आहे. राष्ट्रवादीचे नगरसेवकही इथे आलेत, कारण आमची बाजू सत्याची आहे” असं नरेश म्हस्के म्हणाले.

‘आव्हाडांनी मुंब्र्यातील शिवसेना संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले’

जितेंद्र आव्हाड उद्धव ठाकरेंच स्वागत करणार आहेत, त्यावर त्यांनी 500 रुपये देऊन माणस आणलीत असं म्हस्के म्हणाले. सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे, “जितेंद्र आव्हाड यांनी मुंब्र्यातील शिवसेना संपवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. आज आमच्या शिवसैनिकांच्या छाताडावर नाचण्यासाठी उद्धव ठाकरे येत आहेत” असं नरेश म्हस्के म्हणाले.