सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात; म्हणाले, “लवकरचं सभेत कुणाचा समाचार घ्यायचा ते घेणार”

लवकरचं ठाण्यात सभा घेणार असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सभा घेईन त्यावेळी कुणाचा समाचार घ्यायचा ते घेईन असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात; म्हणाले, लवकरचं सभेत कुणाचा समाचार घ्यायचा ते घेणार
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: Jan 26, 2023 | 3:27 PM

 नचिकेत चव्हाण, प्रतिनिधी, ठाणे : सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात गेले. ठाणे हा एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा गड समजला जातो. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर चिदानंद महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी ठाण्यात गेले होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले. मी या ठिकाणी पाहिल्यांदा आलोय, असं नाही. या आधीदेखील आलो आहे. आपलं नातं जूनं आहे. आपण अतिथी बोललात, ते योग्य नाही. मी याच परिवारातला आहे. अतिथी बाहेरून येतात, त्यांना म्हणतात. मी माझ्या जैन समाजात आलो आहे. मी मागे राजस्थानला गेलेलो तेव्हा देखील भेटलो होतो, याची आठवण त्यांनी करून दिली.

उद्धव ठाकरे म्हणाले, आज प्रजासत्ताक आहे. आपणं आपलं संविधान जपलं पाहिजे. त्यासाठी तुम्ही म्हटलं साथ देणार आणि खूनपण देणार. पण, तेवढं करू नका. फक्त मत दया, असं आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केलं. फक्त मतं द्या. बाकी मी बघून घेतो, असंही त्यांनी सांगितलं.

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात

अखंड भारताचं मुनींच स्वप्न आहे. ते पूर्ण करू. पण, त्यासाठी आशीर्वादाची गरज असल्याचं त्यांनी म्हंटलं. बाळासाहेब यांनी ज्या प्रमाणे तुम्हाला सगळं दिलं. तसंच मी तुम्हाला सगळं देणार आहे, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

सत्तांतरानंतर उद्धव ठाकरे प्रथमच ठाण्यात गेले. ठाण्यातील जैन समाजाच्या कार्यक्रमाला उद्धव ठाकरे दाखल झाले. मोठ्या प्रमाणात जैन बांधव उद्धव ठाकरे यांच्या स्वागताला उपस्थित होते.

सभेत घेणार समाचार

जैन समाजाच्या मुनींचे उद्धव ठाकरे यांनी दर्शन घेतले. लवकरचं ठाण्यात सभा घेणार असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. सभा घेईन त्यावेळी कुणाचा समाचार घ्यायचा ते घेईन असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

यावेळी बोलताना चिदानंद महाराज म्हणाले, उद्धवजी तुम्ही सुरवात करा मी तुमच्यासोबत आहे. तुमचे वडीलदेखील या ठिकाणी आले होते. तुम्ही अतिथी नाही घरी कधीही येऊ शकत. तुम्हाला बाळासाहेब ठाकरे यांनी कमान सोपवाली. तसेच आम्हीदेखील त्यात सहभागी आहोत.

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.