दिल्लीतून फोन आला तर मिंधेची पँट खराब होते; उद्धव ठाकरे शिंदेंवर बरसले

ठाण्यात मोठा राडा झालेला पाहायला मिळाला. उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी हल्ला केला, त्यांच्या गाडीवर नारळ आणि बांगड्या फेकण्यात आल्या. त्यानंतर उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणात थेट मुख्यमंत्री एकनाथ शिदेंवर जोरदार निशाणा साधला.

दिल्लीतून फोन आला तर मिंधेची पँट खराब होते; उद्धव ठाकरे शिंदेंवर बरसले
Follow us
| Updated on: Aug 10, 2024 | 10:35 PM

ठण्यातील गडकरी रंगायतन सभागृहात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली. एकनाथ शिंदे यांना मिंधे म्हणत दिल्लीत गेल्यावर नाहीतर तिथून फोन आल्यावर त्यांची पँट खराब होत असल्याचं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

नमक हराम2 ची उत्सुकता आहे. नागांचा मी अपमान करू शकत नाही. हे मांडूळ आहेत. गांढूळ नाही. हे दुतोंडी आहे. यांना फणा नाही. हे मोदींसमोर वळवळ करणारे मांढूळ आहे. हे लोटांगण घालतात. पँट तिकडे जाऊन खराब होत नाही. फोन आल्यावरच खराब होते. जसे असाल तसे या, फोन येताच पळतात नशीब पँट घातलेली असते, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

लबाडी करून ठाणे जिंकलं. मी ठाणेकरांचं कौतुक करायला आलो. सर्व काही पळवलं, जोर जबरदस्ती आणि पैशाचं वाटप. तरीही सव्वापाच लाख ठाणेकर निष्ठेने आपल्या बाजूला राहिले. वैशाली ताई साधी कार्यकर्ती. समोर मिंध्याचं कार्ट. तरीही या साध्या शिवसैनिकाचा पराभव करायला विश्वगुरुंना आणलं. तरीही चार लाख मते मिळाली हा आपला विजय आहे. प्रचंड पैसा ओतून मते मिळाली. तरीही विजय दिसत नाही म्हणून लांड्या लबाड्या केल्या. ४८ मतांनी मुंबईत आपला पराभव होऊ शकतो का? होऊच शकत नाही, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

मतदार खरे की खोटे तपासा. मतदान केंद्रापर्यंत मतदारांना न्या. यांनी कितीही पैसा ओतला तरी आपला विजय झाल्या शिवाय राहणार नाही. पण गफलत करू नका. मला जमाव नको. मला संघटनात्मक काम करणारे सैनिक हवेत. हेच माझे सैन्य आहे. मध्यंतरी मी मुनगंटीवारांना म्हटलं, तुम्ही पक्ष चोरला. चिन्ह चोरलं पण सैन्य चोरू शकत नसल्याचं ठाकरेंनी सांगितलं.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.