थोर तुझे उपकार, घरकाम करुन वाढवलं, मुलाने पांग फेडलं, 50 व्या वाढदिवशी आईला अनोखं गिफ्ट

ज्या आईनं मुलांना अक्षरशः घरकामं करुन वाढवलं, शिक्षण दिलं, मोठं केलं, त्या आईला तिच्या 50 व्या वाढदिवशी मुलाने सरप्राईज म्हणून चक्क हेलिकॉप्टरची राईड गिफ्ट केली.

थोर तुझे उपकार, घरकाम करुन वाढवलं, मुलाने पांग फेडलं, 50 व्या वाढदिवशी आईला अनोखं गिफ्ट
थोर तुझे उपकार, घरकाम करुन वाढवलं, मुलाने पांग फेडलं, 50 व्या वाढदिवशी आईला अनोखं गिफ्ट
Follow us
| Updated on: Aug 16, 2021 | 7:15 PM

उल्हासनगर (ठाणे) : ज्या आईनं मुलांना अक्षरशः घरकामं करुन वाढवलं, शिक्षण दिलं, मोठं केलं, त्या आईला तिच्या 50 व्या वाढदिवशी मुलाने सरप्राईज म्हणून चक्क हेलिकॉप्टरची राईड गिफ्ट केली. मुलाचं हे अनोखं गिफ्ट पाहून आईला आनंदाश्रू अनावर झाले. उल्हासनगरच्या प्रदीप गरड यानं त्याच्या आईला दिलेल्या या अनोख्या गिफ्टची शहरात मोठी चर्चा आहे.

आईने घरकाम करुन वाढवलं

रेखा दिलीप गरड या मूळच्या सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातल्या. लग्न होऊन उल्हासनगरात आल्या. मात्र मुलं लहान असतानाच अचानक पती दिलीप गरड यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचा मोठा मुलगा सातवीला, मधली मुलगी पाचवीला, तर लहान मुलगा पहिलीत होता. यानंतर रेखा यांनी अतिशय कष्टाने तीनही मुलांना वाढवलं. मुलांना पालनपोषणासाठी रेखा यांनी अक्षरशः लोकांच्या घरची घरकामं केली. मोठा मुलगा प्रदीप याला त्यांनी आश्रमशाळेत शिकवलं. तिथे प्रदीप यानेही अतिशय जिद्दीने शिक्षण पूर्ण केलं आणि नोकरीला लागला.

मुलाकडून वाढदिवसी अनोखं गिफ्ट

प्रदीप हा बारावीला असताना अचानक एक दिवस त्यांच्या घरावरुन हेलिकॉप्टर गेलं. यावेळी आपल्याला कधी यात बसायला मिळेल? असं रेखा या सहज बोलून गेल्या. ती गोष्ट प्रदीपच्या मनात पक्की बसली. पुढे नोकरीत प्रगती करत प्रदीप हा आई आणि कुटुंबाला घेऊन चाळीतून स्वतःच्या फ्लॅटमध्ये आला. लग्न झालं, दोन मुलं झाली, पण आईची ‘ती’ इच्छा कशी पूर्ण करावी? याची सल त्याला बोचत होती. अखेर आईच्या 50 व्या वाढदिवसाला तिला सरप्राईज म्हणून हेलिकॉप्टरने फिरवण्याची कल्पना प्रदीपला सुचली.

श्रावण महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी प्रदीपच्या आईचा वाढदिवस असतो. त्यानुसार चौकशी करुन त्याने सगळी तयारी केली आणि आज सकाळी वाढदिवसानिमित्त सिद्धिविनायकाचं दर्शन घ्यायचं असल्याचं सांगत आईला थेट जुहू एअरबेसला नेलं. तिथं हेलिकॉप्टर पाहून आईला आनंदाश्रू आवरता आले नाहीत. आईसह प्रदीप, प्रदीपचं लहान भाऊ संदीप, प्रदीपची पत्नी, मुलं यांनीही हेलिकॉप्टर राईडचा आनंद घेतला. यानंतर या सगळ्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया काय? असा प्रश्न विचारताच प्रदीप यांच्या आईला भावना आवरता आल्या नाहीत.

मुलाचाही कंठ दाटून आला

या सगळ्यानंतर बोलताना प्रदीप याचाही कंठ दाटून आला होता. आईने आपल्याला खूप हालअपेष्टा सहन करुन वाढवलं, मोठं केलं. इतकंच नव्हे तर स्वतःच्या पायावर उभं केलं. त्यामुळे तिची अपूर्ण इच्छा पूर्ण करण्याची संधी मिळणं हेच माझ्यासाठी भाग्य असल्याचं प्रदीप कृतज्ञपणे सांगतो. या सगळ्यामुळे आईचा आनंद गगनात मावेनासा आल्यानंतर प्रदीपनंही आनंद व्यक्त केला.

आईची प्रतिक्रिया

ज्या आईने आपल्याला बोट धरुन चालायला शिकवलं, त्याच आईची इच्छा पूर्ण करत तिला घेऊन हेलिकॉप्टरने आकाशाला गवसणी घालणारा प्रदीप गरड हा आजच्या युगातला श्रावणबाळच म्हणावा लागेल. त्यामुळेच असा मुलगा सगळ्यांना मिळो, असं त्याची आई सुद्धा म्हणायला विसरली नाही.

हेही वाचा :

“शिवाजी महाराजांनी बुद्धी, शक्तीने राज्य केलं, मुलांनी तानाजी मालुसरे व्हावं,” सिंहगड सर केल्यानंतर राज्यपालांचे उद्गार

हिंगोलीत शिवसेनेला पालकमंत्र्यांचं वावडं? वर्षा गायकवाडांच्या सर्व कार्यक्रमांकडे शिवसेना नेत्यांची पाठ

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.