शिवसेनेच्या रॅलींमधून कोरोना पसरत नाही का?; कपिल पाटलांचा राऊतांवर पलटवार
जन आशीर्वाद रॅली म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या टीकेला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. (union minister kapil patil reply to sanjay raut over criticize jan ashirwad rally)

कल्याण: जन आशीर्वाद रॅली म्हणजे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला निमंत्रण आहे, अशी टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. राऊत यांच्या या टीकेला केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शिवसेना आणि राज्य सरकार पुरस्कृत रॅली आणि कार्यक्रमांना गर्दी होते. तेव्हा कोरोना पसरत नाही का?, असा सवाल कपिल पाटील यांनी केला आहे. (union minister kapil patil reply to sanjay raut over criticize jan ashirwad rally)
केंद्रीय पंचाय राज राज्यमंत्री कपिल पाटील यांची जन आशीर्वाद यात्रा आज कल्याणमध्ये आली होती. कल्याणच्या दुर्गाडी चौकातून या यात्रेला सुरुवात झाली. या यात्रेला कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी झाली होती. यात्रेमुळे चौकात एका बाजूची वाहतूक बंद केल्याने वाहन चालकांना नाहकचा त्रास सहन करावा लागला. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली. कोरोनाचे सर्व नियम पाळून जन आशीर्वाद यात्रा सुरू आहे. शिवसेना नेते आणि युवा नेत्यांच्या कार्यक्रमात मास्कही लावलेला नसतो. प्रचंड गर्दी असते. याचा अर्थ सरकार पुरस्कृत शिवसेनेच्या रॅलींमध्ये कोरोना पसरत नाही. पुण्यातील कार्यक्रमात 5 ते 10 हजार लोक जमतात. तिथे कोरोना होत नाही. भाजपने काही केले तर लगेच कोरोनाला आमंत्रण कसे मिळते?, असा सवाल पाटील यांनी केला.
वारकऱ्यांसोबत ठेका धरला
पाटील यांच्या यात्रेला दुर्गाडी चौकापासून सुरुवात झाली. ही यात्रा कल्याणच्या प्रेम आटो चौकात पोहोचली. तेव्हा वारकरी संप्रदायाने त्यांचे टाळ मृदुंग वाजवून स्वागत केले. यावेळी पाटील यांनी देखील त्यांच्यासोबत टाळ मृदुंगाच्या गजरात ठेका धरला. बल्यानी चौकात ही यात्रा आल्यानंतर मुस्लिम महिलांनी तीन तलाक विधेयक मंजूर केल्याबद्दल पाटील यांचे आभार मानले. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मुस्लिम महिलांना न्याय देण्याच काम केलं. मात्र त्याचं काही जणांनीराजकारण केलं. तरीही या राजकारणावर मात करत आमच्या भगिनी मोदीना धन्यवाद करण्यासाठी येथे आल्या आहेत. भारत बदलतोय, नवीन भारत घडत आहे, असं पाटील म्हणाले.
कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गाची प्रक्रिया लवकरच
यावेळी त्यांनी कल्याण-मुरबाड रेल्वेमार्गावरही प्रतिक्रिया व्यक्त केली. कल्याण-मुरबाड रेल्वे प्रकल्पाचा डीपीआर केंद्रात पाठवण्यात आलाय. माझा पाठपुरावा सुरू आहे. लवकरच हा प्रकल्प मार्गी लागेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
शिवसेनेच्या नेत्याकडून स्वागत
ही यात्रा कल्याण नजीक बल्याणी परिसरात पोहोचल्यानंतर शिवसेनेच्या माजी नगरसेवक मयूर पाटील यांनी देखील कपिल पाटील यांचे स्वागत केले. कल्याण-डोंबिवलीत शिवसेनेच्या नेत्यांकडून कपिल पाटील यांच्या स्वागत सुरूच असल्याने शहरात चर्चेला एकच उधाण आले आहे. (union minister kapil patil reply to sanjay raut over criticize jan ashirwad rally)
VIDEO : 100 Super Fast News100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 18 August 2021https://t.co/i1f1jjtCtb#100SuperFastNews #NewsBulletin #TV9
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 18, 2021
संबंधित बातम्या:
जन आशीर्वाद यात्रा म्हणजे तिसऱ्या लाटेला निमंत्रण; संजय राऊतांची भाजपवर टीका
महाराष्ट्रातून 40 मंत्री केले तरी शिवसेना संपणार नाही; उदय सामंतांनी भाजपला ललकारले
उद्धव ठाकरे टॉप फाईव्ह मुख्यमंत्र्याच्या यादीत; प्रविण दरेकर म्हणतात, कशाच्या आधारावर सर्व्हे झाला?
(union minister kapil patil reply to sanjay raut over criticize jan ashirwad rally)