Vasai Virar | वसई विरारचा लेव्हल 3 मध्ये समावेश, काय सुरू काय बंद? वाचा…
राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार वसई विरार महापालिकेचा लेव्हल 3 मध्ये समावेश झालाय.
वसई विरार : राज्य सरकारच्या नव्या नियमावलीनुसार वसई विरार महापालिकेचा लेव्हल 3 मध्ये समावेश झालाय. सध्या वसई विरारचा कोरोना संसर्गाचा दर 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे, तर 40 टक्केपेक्षा अधिक ऑक्सिजन बेड वापरात आहेत. त्यामुळे वसई विरार महापालिका क्षेत्राला लेव्हल 3 साठीचे राज्य सरकारचे सर्व निर्बंध लागू राहतील (Vasai Virar in level 3 of corona infection know about new rules).
वसई विरारसह पालघर जिल्ह्यात काय सुरू राहणार?
- अत्यावश्यक सेवेतील दुकाने आणि आस्थापनं सोमवार ते रविवार सकाळी 2 ते 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
- अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 पर्यंत सुरू राहतील
- रेस्टॉरंट सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते दुपारी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील. 4 नंतर पार्सल सेवा सुरू राहील आणि शनिवार रविवार फक्त पार्सल सेवा सुरू राहील.
- लोकल ट्रेनसाठी मुंबई महापालिकेने लागू केलेले आदेश लागू राहतील
- सार्वजनिक उधाने, मैदान, ,चालणे, सायकलिंग सकाळी 5 ते सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहतील
- खाजगी आस्थापना दुपारी 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
- कार्यालयीन उपस्थिती 50 टक्के क्षमतेने सुरू राहातील
- खेळ सोमवार ते रविवार सकाळी 5 ते सकाळी 9 आणि सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत सुरू राहतील
- शुटिंग चित्रीकरण बबलच्या आतमध्ये सायंकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहतील
- सामाजिक, सांस्कृतिक व मनोरंजनात्मक कार्यक्रम सोमवार ते शुक्रवार 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील
- विवाह समारंभास 50 व्यक्ती तर अंत्यविधीसाठी 20 माणसांची उपस्थितीची मर्यादा
- बैठका, निवडणुका, वार्षिक सर्वसाधारण बैठका 50 टक्के उपस्थिती
- बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी राहणाऱ्या मजुरांवर बांधकाम करता येईल, त्यांना 4 वाजता सुट्टी देणे बंधनकारक आहे
- कृषीविषयक सर्व कामे 4 वाजेपर्यंत सुरू राहतील
- ई कॉमर्स नियमित सुरू राहतील
- जिम, सलून , ब्युटीपार्लर, स्पा, सोमवार ते रविवार सायंकाळी 4 वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील, गिऱ्हाईकांना वेळ ठरवूनच बोलवावे लागेल
- सार्वजनिक वाहतून 100 टक्के आसन क्षमतेने चालू राहणार
- अंतर जिल्हा प्रवास नियमित सुरू राहतील, परंतु निर्बंध स्तर लेवल 5 मधील जिल्ह्यामध्ये जाण्याकरिता किंवा जिल्ह्यामधून वाहतूक करताना थांबणार असतील तर ई पास आवश्यक राहील
काय बंद राहणार?
- अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने शनिवारी आणि रविवारी पूर्णपणे बंद राहतील
- मॉल्स, सिनेमागृह, नाट्यगृह पूर्णपणे बंद राहतील
- शुटिंग चित्रीकरण करताना बबलच्या बाहेर फिरता येणार नाही
- वसई विरार महापालिका क्षेत्रात सायंकाळी 5 पर्यंत जमावबंदी, तर 5 नंतर संचारबंदी राहणार आहे
- सार्वजनिक वाहतून 100 टक्के आसन क्षमतेने होईल, पण प्रवाशांना उभं राहून प्रवास करता येणार नाही
- जिम, सलून , ब्युटीपार्लर, स्पामध्ये वातानुकूलतेचा वापर करता येणार नाही
हेही वाचा :
नालासोपारा लसीकरण केंद्रात लसीकरणाच्या रांगेत चक्कर, पुढच्या क्षणातचं सर्व संपलं
अधिकाऱ्याच्या चुकीच्या माहितीचा फटका, बुलडाणा जिल्हा थेट तिसऱ्या टप्प्यात, अनलॉक अंतर्गत येणार अनेक निर्बंध
Nagpur Unlock | अनलॉक अंतर्गत नागपूरमध्ये नवी नियमावली, सायंकाळी 5 नंतर जमावबंदी, काय बंद काय सुरु ?
व्हिडीओ पाहा :
Vasai Virar in level 3 of corona infection know about new rules