या भागात पावसाळी पर्यटनावर बंदी, तरीही पर्यटक घेतात सुटीचा आनंद

राष्ट्रीय महामार्गावर घाटाच्या पायथ्याशी चौकीवर स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस हौशी पर्यटकांना मज्जाव करतात. मात्र, पर्यटक कुठल्यातरी मार्गाने घाटातील धबधब्यावर पोहचून पाण्यात पोहण्याचा आनंद घेतात.

या भागात पावसाळी पर्यटनावर बंदी, तरीही पर्यटक घेतात सुटीचा आनंद
Follow us
| Updated on: Jul 23, 2023 | 6:48 PM

ठाणे : कल्याण-अहमदनगर या ६१ क्रमांक असलेल्या राष्ट्रीय महामार्गावर मालशेज घाट आहे. मालशेज घाट पावसाळ्यात पर्यटनासाठी महत्वाचा मानला जातो. या घाटात पावसाळ्यात अनेक छोटे-मोठे धबधबे प्रवाहित होतात. निर्सगरम्य असलेल्या या ठिकाणाचा आनंद घेण्यासाठी अनेक हौशी पर्यटक येतात. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, पालघरवरून पर्यटक पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतात. मात्र, या घाटात दरड कोसळणे, धबधब्याच्या पाण्यासोबत दगडी वाहत येणे अशा घटना घडतात. तसेच अनेक अपघातदेखील घडतात. यामुळे जिल्हा प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षितेसाठी कलम १४४ लागू केली. पर्यटनावर मनाई आदेश जाहीर केला. ३० ऑगष्टपर्यंत या ठिकाणी पर्यटकांना बंदी घातली आहे.

पाण्यात पोहण्याचा आनंद

राष्ट्रीय महामार्गावर घाटाच्या पायथ्याशी चौकीवर स्थानिक पोलीस आणि महामार्ग पोलीस हौशी पर्यटकांना मज्जाव करतात. मात्र, पर्यटक कुठल्यातरी मार्गाने घाटातील धबधब्यावर पोहचून पाण्यात पोहण्याचा आनंद घेतात. रविवारी सुट्टीचा दिवस असल्यामुळे अनेक, हौशी पर्यटकांनी आपल्या कुटुंबासह हजेरी लावली. या ठिकाणी उंचावरून पडून फेसळणारे धबधबे, निसर्गाने वेढलेल्या डोंगररांगा, पाण्यात भिजण्याचा मनमोहक आनंद घेताना दिसत होते. अनेक पर्यटक मुंबईसह उपनगरातून याठिकाणी येऊन भिजण्याचा आनंद घेतल्याचा समाधान व्यक्त करत होते.

व्यवसायिकांची नाराजी

जिल्हाधिकारी यांनी मालशेज घाटावर पर्यटकांना मनाई हुकुम लावला. त्यामुळे नेहमीपेक्षा यावेळेस गर्दी कमी आहे. आमच्यावर उपासमारीची वेळ आल्याचे स्थानिक व्यवसायिकांनी बंदीबाबत नाराजी व्यक्त केली. प्रशासनाने याचा फेरविचार करावा, अशी मागणी अंकुश भोईर यांनी केली आहे.

ओझर्डे धबधबा पर्यटकांना पाहण्यासाठी बंदी

अतिवृष्टी आणि भुस्खलनाच्या पार्श्वभूमीवर कोयनानगरचा ओझर्डे धबधबा पर्यटकांना पाहण्यासाठी बंदी केली. पावसाळ्यात नेहमी गजबजलेला ओझर्डे धबधबा परिसर पर्यटकांनविना सुनासुना दिसत आहे. सातारा, पाटण तालुक्यातील कोयनानगरच्या डोंगरदऱ्यातील छोटे मोठे धबधबे ओसांडून वाहत आहेत. कोयनानगर जवळील 800 फुटांवरून कोसळणारा ओझर्डे धबधबा प्रवाहित झाला असला तरी प्रशासनाने पर्यटनास बंदी घातली आहे. दोन वर्षापूर्वी याच धबधब्याच्या शेजारी भुस्खलन होऊन हा परिसर उजाड झाला आहे. कोयना विभाग पोलीस आणि वनविभागाची सतत गस्त सुरु आहे. डोंगर जंगल भागात पर्यटकांना बंदी केली जात आहे.

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.