ठाण्यात आधी 16 पक्षांचा मृत्यू, आता पुन्हा गिधाडं आणि बगळे मृत सापडल्याने धाकधूक वाढली

दोन दिवसांपूर्वी घोडबंदर वाघबीळ परिसरात 14 पाणबगळे आणि 2 पोपट मृतावस्थेत आढळेलले असताना आता त्याच भागात एक गिधाड मृतावस्थेत सापडले आहे. त्यासोबतच काही पांढरे बगळे आणि पाणबगळेसुद्धा पुन्हा आज (9 जानेवारी) मृतावस्थेत आढळले आहेत.

ठाण्यात आधी 16 पक्षांचा मृत्यू, आता पुन्हा गिधाडं आणि बगळे मृत सापडल्याने धाकधूक वाढली
Follow us
| Updated on: Jan 09, 2021 | 2:28 PM

ठाणे : दोन दिवसांपूर्वी घोडबंदर वाघबीळ परिसरात 14 पाणबगळे आणि 2 पोपट मृतावस्थेत आढळेलले असताना आता त्याच भागात एक गिधाड मृतावस्थेत सापडले आहे. त्यासोबतच काही पांढरे बगळे आणि पाणबगळेसुद्धा पुन्हा मृतावस्थेत आढळले आहेत. पक्षांच्या या अचानक मृत्यूमुळे येथील नागरिक घाबरले असून पक्षांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अजून समोर आले नाही. पक्षांमध्ये आढळणारा बर्ड फ्लू या आजाराने पुन्हा एकादा डोके वर काढल्यानंतर गिधाड आणि बगळे मृतावस्थेत सापड्यामुळे अनेक तर्क लावले जात आहेत. (vulture and heron has found dead in thane possibility of bird flu disease infection)

मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवारी (8 जानेवरी) घोडबंदर वाघबीळ परिसरात एक गिधाड मृतावस्थेत आढळले. हे गिधाड अत्यंत दुर्माळ प्रजातीचे असून याला युरेशियन गिधाड म्हटलं जातं. हे गिधाड नागरिकांना घोडबंदर वाघबीळ या भागात मृत आवस्थेत पडेलेले आढळले. त्यासोतबच आज ( 9 डिसेंबर) याच परिसरात काही पांढरे बगळे आणि पाणबगळेसुद्धा मृतावस्थेत आढळले. याआधी मेलेल्या 16 पक्षांचा मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाला नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आता पुन्हा बगळे आणि गिधाड मृतावस्थेत सापडल्यामुळे नागरिकांत पुन्हा एकदा भीती निर्माण झाली आहे. तसेच, मेलेले गिधाड अत्यंत दुर्मीळ प्रजातीचे असल्यामुळे प्राणीप्रेमींकडून चिंता व्यक्त होत आहे.

सध्या बर्ड फ्लूच्या केसेस मध्यप्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि केरळमध्ये आठळल्या आहेत. महाराष्ट्रात अद्याप कोणत्याही पक्षाला बर्ड फ्लू झाल्याचे आढळलेले नाही. मात्र बर्ड फ्लूच्या भीतीने देशातील चिकन आणि अंड्याची मागणी जवळपास 60 टक्क्यांनी कमी झालीय. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचे दरही कोसळले आहेत.

दरम्यान यामुळे पोल्ट्री व्यावसायिकांच्या अडचणीत चांगलीच वाढ झाली आहे. विशेष म्हणजे या काळात पोल्ट्री व्यवसायाशी संबंधित कंपन्यांच्या शेअर देखील कोसळत आहेत. मागील काही दिवसांपासून चिकन आणि अंड्यांच्या मागणीत 60 टक्क्याने घट झालीय. त्यामुळेच त्याच्या किमतीवरही परिणाम झालाय. मागील आठवड्यात एका पक्षाची म्हणजेच कोंबड्याची किंमत 100 रुपये किलो होती, तिथं आता घट होऊन 60 रुपये प्रति किलो दर झाल्याचे चिकन व्यावसायिक म्हणत आहे.

संबंधित बातम्या :

Bird Flu | कोंबडीचे मांस आणि अंडी खाल्ल्याने ‘बर्ड फ्लू’चा धोका? वाचा संशोधन काय म्हणतेय…

Bird Flu | बर्ड फ्लू नेमका काय?, लक्षणे कोणती?, औषध काय?, सर्व प्रश्नांची उत्तरं!

आधी कोरोनाचा फटका, आता नवं संकट, थंडीतही अंडे आणि चिकनच्या किमती कमी होण्याचं कारण काय?

(vulture and heron has found dead in thane possibility of bird flu disease infection)

माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.