Kalyan Crime: पती-पत्नीने मित्रांच्या मदतीने रिक्षा चालकास बेदम मारहाण करुन लुटले, सीसीटीव्हीच्या सहाय्याने लागला गुन्ह्याचा छडा
सहा तासांच्या आत उल्हासनगरमध्ये राहणारे राहणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये करण दखनी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याची पत्नी चैताली पाटील, मित्र कुणाल जाधव आणि एका अल्पवयीन तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कल्याण : रिक्षात बसलेल्या पती पत्नीने मित्रांच्या सहाय्याने रिक्षाचालकास बेदमा मारहाण करुन लुटल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. हे पाचही जण रिक्षा चालकास बेदम मारहाण करीत त्याच्याकडील मोबाईल, रोकड आणि रिक्षा घेऊन पसार झाले होते. कल्याणच्या कोळसेवाडी पोलिसांनी सहा तासाच्या आतच सीसीटीव्हीच्या सहय्याने चार आरोपींना अटक केली आहे. अन्य एका आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत.
काय घडले?
अंबरनाथमध्ये पश्चिमेत राहणारा जावेद शेख हा रिक्षा चालवितो. 29 तारखेच्या रात्री एक पती पत्नी त्याच्याकडे आले. त्यांना एका ठिकाणी जायचे आहे. तिथे घेऊन चल तुझे काय भाडे होईल ते देऊ, असे या जोडप्याने सांगितले आणि ते रिक्षा बसले. ही रिक्षा उल्हासनगरात पोहचताच या दोघांचे अन्य तीन साथीदार आले. तेही रिक्षात बसले. रिक्षा थेट कल्याण पूर्व भागातील काटेमानिवली परिसरात असलेल्या ड प्रभाग परिसरात पोहचली. याठिकाणी या पाचही जणांनी रिक्षा चालकास एका ठिकाणी थांवून नशापान केले. त्यानंतर जावेद शेख याला मारहाण सुरु केली. त्याला बेदम मारहाण करीत त्याला खाली पाडले. रिक्षा घेऊन हे पाचही जण पसार झाले.
सीसीटीव्हीच्या सहाय्याने चौघांना पकडण्यास यश
अंबरनाथचे सामाजिक कार्यकर्ते सलीम चौधरी यांच्या कार्यकर्त्यासोबत रिक्षा चालक जावेद शेख हा पोलीस ठाण्यात पोहचला. त्याने सर्व हकीगत पोलिसांना सांगितली. कल्याणचे एसीपी उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरिक्षक बशीर शेख, पोलीस अधिकारी हरीदास बोचरे यांच्या तपास पथकाने या प्रकरणाचा तपास सुरु केला. एका ठिकाणी रस्त्यात रिक्षात बसून रिक्षा जात असल्याचा सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागला. त्या आधारे पोलिसांनी आरोपींची ओळख पटविली.
सहा तासांच्या आत उल्हासनगरमध्ये राहणारे राहणाऱ्या चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यामध्ये करण दखनी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याची पत्नी चैताली पाटील, मित्र कुणाल जाधव आणि एका अल्पवयीन तरुणीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. चौघांपैकी तिघांना आज कल्याण न्यायालयात हजर केले असता कल्याण न्यायालयाने तिघांना पोलीस कोठडी सुनावली आहे. एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केली जाणार आहे. एका फरार आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु आहे. (With the help of friends, the couple beat up the rickshaw driver and robbed him)
इतर बातम्या
Jalna Suicide | कौटुंबिक वादातून टोकाचं पाऊल, चार लेकरांसह आईची विहिरीत उडी